उत्पादक वयोगटातील हृदयरोग देशाच्या विकासाला घातक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मुंबई - देशातील तरुणांमध्ये हृदयरोगाचा वाढता धोका आता चिंतेची बाब ठरू लागली आहे. ३० ते ४० वर्षे वयोगटातील तब्बल १३ टक्के जणांना हृदयरोग होण्याची शक्‍यता असते, असे डॉक्‍टरांनी सांगितले. या उत्पादक वयोगटातील व्यक्तींनाच हृदयरोगाने ग्रासल्यामुळे भविष्यात देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, अशी भीतीही डॉक्‍टर व्यक्‍त करीत आहेत.

वेगवान जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि स्पर्धा यामुळे मानसिक आजारांतही वाढ होत आहे. वाढत्या तणावामुळे मधुमेहाचे रुग्ण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जाते. तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे हृदयरोगाला आमंत्रण मिळते. 

३० ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तींना होणारा हृदयरोग देशाच्या भविष्यासाठी धोकादायक ठरेल, असा इशारा हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे यांनी डायबिटीस सोसायटी ऑफ इंडियाच्या नुकत्याच झालेल्या परिषदेत दिला. या वयोगटातील नागरिकांमध्ये हा आजार पाच वर्षांतच जास्त वाढल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Youth heart Sickness Development