युवा हीच मुंबईची खरी शक्ती : ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

ठाकरे म्हणाले, "युवाशक्ती ही मुंबईचीच नव्हे तर आपल्या देशाची ताकद आहे. आज जगात जे युवा लोकसंख्येचे देश आहेत, त्यामध्ये हिंदुस्थानचा क्रमांक वरचा आहे.

मुंबई : युवाशक्ती ही मुंबई शहराची खरी शक्ती असून या ऊर्जेचा उपयोग योग्य पद्धतीने झाला पाहिजे, असे प्रतिपादन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले. 

ठाकरे म्हणाले, "युवाशक्ती ही मुंबईचीच नव्हे तर आपल्या देशाची ताकद आहे. आज जगात जे युवा लोकसंख्येचे देश आहेत, त्यामध्ये हिंदुस्थानचा क्रमांक वरचा आहे. या युवाशक्तीचा उपयोग विधायक पदधतीने केला तर राष्ट्राला व समाजाला याचा मोठा फायदा होऊ शकतो. मात्र जर या तरुणाईला योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर ही तरुण शक्ती भरकटू शकते. त्यामुळे समाजातील जाणत्यांनी तरुणांना मार्गदर्शन करावे आणि तरुणांनीही हे मार्गदर्शन नम्रतेने स्वीकारावे.'' 

प्रभादेवीतील प्रभादेवी मंदिरानजीक असलेल्या स्वामी समर्थ मंडळाच्या सुसज्ज व्यायामशाळेचे उद्‌घाटन काल (सोमवारी) ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 
यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, महिला विभाग संघटक किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते. 
 

Web Title: youth is the real power of the country