वांद्य्रात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

मुंबई - वांद्य्रात एका तरुणाने भीतीपोटी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (ता. 17) घडली. नूर मोहम्मद शेख (रा. वांद्रे) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर वांद्य्रातील भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नूरने चार महिन्यांपूर्वी दोन नातेवाइकांना नोकरीसाठी मलेशियाला पाठवले होते. त्या दोघांच्या पारपत्राची मुदत संपल्याने नूरने त्यांच्या पारपत्राचा खर्च करून त्यांना पुन्हा मुंबईत आणावे, असा तगादा नातेवाइकांनी नूरकडे लावला होता. मंगळवारी नूरने वांद्रे तलाव येथील कार्यालयात कामाला आल्यावर आपण भीतीने आत्महत्या करतोय, असा फोन बहिणीला केला.

नूरच्या बहिणीने माहिती दिल्यावर वांद्रे पोलिस त्याच्या कार्यालयात पोचण्यापूर्वीच त्याने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला उपचाराकरिता पालिकेच्या भाभा रुग्णालयात दाखल केले. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वरिष्ठ निरीक्षक पंडित ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: youth suicide trying