आरेत तरुणाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

मुंबई - गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनीतील सुमित अपार्टमेंटच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली. मंगळवारी (ता. 5) ही घटना घडली. चंद्रकांत ललित परमार (27) असे मृताचे नाव आहे. परमारने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना घटनास्थळी सापडली. त्यात चंद्रकांतने आपल्या आत्महत्येस कोणालाही दोषी धरू नये, असे म्हटले आहे.

चंद्रकांत हा मूळ राजस्थानचा रहिवासी होता. तो सध्या आरे कॉलनीतील रॉयल्स पार्कमधील सुमित अपार्टमेंट येथे राहायचा. तो एका खासगी कंपनीत क्रू-मेंबर होता. मंगळवारी दुपारी त्याने इमारतीवरून उडी मारली. त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून सुरक्षा रक्षकाने पोलिसांना कळवले. स्थानिकांनी चंद्रकांतला रुग्णालयात दाखल केले; मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. आत्महत्येचे निश्‍चित कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. पंचनामा करून पोलिसांनी नातेवाईकांचे जबाब नोंदवले. 

Web Title: youth's suicide in mumbai

टॅग्स