युतीने नेमले समन्वयक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

मुंबई - एकमेकांच्या गळ्यात गळा घालण्यात शिवसेना- भाजप आनंद मानत असताना, राज्यभरात कुठेही बेकीचे स्वर उमटू नयेत यासाठी समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. 

मुंबई - एकमेकांच्या गळ्यात गळा घालण्यात शिवसेना- भाजप आनंद मानत असताना, राज्यभरात कुठेही बेकीचे स्वर उमटू नयेत यासाठी समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. 

भाजपचे नेते सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या देखरेखीखाली या समित्या काम करणार आहेत. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या तीन जिल्ह्यांत देसाई यांनी भाजपचे राज्यमंत्री रवी गायकवाड मदत करतील. कल्याण ठाणे पालघर भिवंडी या चार लोकसभा मतदारसंघांसाठी रवी चव्हाण यांनाच भाजपने जबाबदारी दिली असून, शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे समन्वयाचे काम पाहतील. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि हातकणंगले येथे समन्वयाची जबाबदारी नितीन बानगुडे पाटील आणि चंद्रकांत पाटील बघणार आहेत. उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेने राज्यमंत्री दादा भुसे यांच्यावर विश्‍वास टाकला आहे. तेथे त्यांना भाजपतर्फे गिरीश महाजन मदत करतील.

वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली ,चंद्रपूर, रामटेक येथे शिवसेनेने माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपवली आहे. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे त्यांना मदत करतील. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद येथे अर्जुन खोतकर आणि पंकजा मुंडे समन्वयाचे काम 
पाहणार आहेत.

Web Title: Yuti Shivsena BjP Politics Coordinator