शिवसेनेच्या मुलाखतींवर 'युवासेने'ची छाप

शिवसेनेच्या मुलाखतींवर 'युवासेने'ची छाप

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आजपासून मुलाखतींच्या कार्यक्रमाला सुरवात झाली असून, 20 सप्टेंबरपर्यंत या मुलाखती सुरू राहणार आहेत. महत्वाचे म्हणजे मुलाखतींसाठी नेमलेल्या समितीवर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भरणा अधिक असल्याने त्यांची छाप या मुलाखतींच्या कार्यक्रमावर अधिक आहे.

10 सप्टेंबर पश्चिम महाराष्ट्र,13 विदर्भ,15 मराठवाडा,17 उत्तर महाराष्ट्र आणि 19 कोकण विभागातील मुलाखती संपन्न होणार आहेत. मुलाखतकारांमध्ये शिवसेनेचे नेते विनायक राऊत, राहुल शेवाळे, मनीषा कायंदे, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावांचा उल्लेख असला तरी युवासेनेचे सरचिटणीसपदासाठी सरदेसाई, श्रीकांत शिंदे, अमोल कीर्तिकर हे अधिक सक्रिय आहेत. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या युवासेनेचे महत्व वाढल्याचे बोलले जाते.

शिवसेना भवनमध्ये इच्छुकांच्या मुलाखतींना आजपासून सुरवात झाली असून, पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुकांनी आज गर्दी केली. शिवसेनेच्या नेत्यांपेक्षा युवासेनेचे पदाधिकाऱ्यांची रेलचेल अधिक दिसत होती. पक्ष प्रमुखांच्या आदेशाने निर्णय घेणाऱ्या शिवसेनेत पहिल्यांदाच पक्षीय लोकशाही तत्वाप्रमाणे मुलाखती घेण्यात येत असून, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुक प्रक्रियेत युवासेना अग्रेसर असल्याचे दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com