मोठी बातमी - UGC च्या निर्णयाविरुध्द सुप्रीम कोर्टात धाव, अंतिम वर्षाच्या परिक्षेचा तिढा सर्वोच्च न्यायालयात

विनोद राऊत
Saturday, 18 July 2020

कोरोना संसर्गाच्या सावटात अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याच्या युजीसीच्या निर्णयाविरोधात युवा सेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मुंबई : कोरोना संसर्गाच्या सावटात अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याच्या युजीसीच्या निर्णयाविरोधात युवा सेनेने थेट सुप्रीम कोर्टाचे दरवाचे ठोठावलेत. आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानूसार युवा सेनेने सर्वोच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली आहे. युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका अद्याप सुनावणीसाठी घेतली नाही.

कोरोनाच्या संसर्गाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शारिरीक, मानसिक आरोग्य आणि सुरक्षिततेचा कुठलाही विचार विद्यापीठ अनुदान आयोगाने केला नाही त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन परिक्षा घेण्याचा अधिकार विद्यापीठांना देण्यात यावा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. 

हे गंभीर आहे ! कोरोनामुक्त झाल्यानंतरही घ्या काळजी, कारण कोरोनामुळे शरीरावर होतो विपरीत परिणाम?

देशात कोरोना बाधितांची संख्या 10 लाखावर पोहोचली आहे. मात्र या परिस्थिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने परिक्षा घेणे बंधनकारक असल्याचे जाहिर केले आहे. यासाठी युजीसीने काही मार्गदर्शन तत्वे जारी केले होती. मात्र त्याची अंमलबजावणीसाठी या काळात करणे शक्य नसल्याचा युक्तीवाद युवा सेनेने  या याचिकेच्या माध्यमातून केला आहे. 

युवा सेनेने परिक्षा न घेता, सरासरी मुल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याची मागणी केली होती. या संदर्भात युजीसी आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्रही पाठवले होते.

मोठी बातमी 'ते' हेल्मेट घातलं की मिनिटाला होते २०० जणांची तपासणी, कोविड सस्क्रीनिंगसाठीचा 'कमाल' पर्याय...

राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परिक्षा न घेण्याचा निर्णय जाहिर केला आहे. दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी परिक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुरीकडे युजीसीने मात्र परिक्षा घेणे विद्यापीठांना बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते यावर सर्व महाराष्ट्रासह सर्व राज्यांचे लक्ष असणार आहे.

( संकलन - सुमित बागुल )

yuva sena knock doors of supreme court against UGC for not conducting last year exams
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yuva sena knock doors of supreme court against UGC for not conducting last year exams