मुंबई विद्यापीठात युवासेनेचा दणदणीत विजय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या दहा जागांसाठी एकूण 68 उमेदवार निवडणूकीसाठी होते. 25 मार्च 2018 रोजी एकूण 53 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले होते. या 10 जागांच्या निकालासाठी दिनांक 27 मार्च 2018 पासून मतमोजणीला सुरुवात झाली होती.

मुंबई - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 नुसार, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील (SENATE) 10 नोंदणीकृत पदवीधर संघाचे निकाल आज जाहीर झाले. या दहा जागांवर युवासेनेने दणदणीत विजय मिळवल. यामध्ये 5 जागांसाठी खुल्या प्रवर्गातून महादेव जगताप, प्रदीप सावंत, प्रवीण पाटकर, सुप्रिया करंडे आणि मिलिंद साटम हे उमेदवार विजयी झाले.

तर राखीव प्रवर्गातील निवडणूकीतून अनुसूचित जाती या प्रवर्गातून निखिल जाधव, अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनराज कोहचाडे, विजा/ भज (DT/NT)  प्रवर्गातून शशिकांत झोरे, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून राजन कोळंबेकर आणि महिला प्रवर्गातून शितल शेठ देवरुखकर हे उमेदवार निवडून आले.

नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या दहा जागांसाठी एकूण 68 उमेदवार निवडणूकीसाठी होते. 25 मार्च 2018 रोजी एकूण 53 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले होते. या 10 जागांच्या निकालासाठी दिनांक 27 मार्च 2018 पासून मतमोजणीला सुरुवात झाली होती.

Web Title: Yuva Sena wins in Mumbai university