दिशाबाबत विचारताच लाजला शिवसेनेचा 'टायगर'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी या दोघांचाही आज वाढदिवस आहे. 13 जून 1992 ही दिशाची जन्मतारीख आहे, तर 13 जून 1990 ही आदित्य ठाकरे यांची जन्मतारीख आहे. दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे काही दिवसांपूर्वी डिनर डेटसाठी मुंबईतील एका हॉटेलबाहेर एकत्र दिसले होते.

मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्यातील डेटींगबद्दल चर्चा सुरु असतानाच आज (13 जून) आदित्य ठाकरेंना पत्रकार परिषदेत दिशाकडून स्पेशल गिफ्ट मिळाले का? असे विचारले असता आदित्य ठाकरे लाजले आणि त्यांनी हात जोडले. 

आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी या दोघांचाही आज वाढदिवस आहे. 13 जून 1992 ही दिशाची जन्मतारीख आहे, तर 13 जून 1990 ही आदित्य ठाकरे यांची जन्मतारीख आहे. दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे काही दिवसांपूर्वी डिनर डेटसाठी मुंबईतील एका हॉटेलबाहेर एकत्र दिसले होते. यापूर्वी टायगर श्रॉफसोबत दिसणारी दिशा अचानक आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिसल्याने नेटिझन्सनी तिला तुफान ट्रोल केले होते.

आज पत्रकार परिषदेत, वाढदिवसाला खास व्यक्तीकडून स्पेशल गिफ्ट मिळाले का, असा प्रश्न विचारला असता, आदित्य ठाकरे लाजले आणि हसत पत्रकारांच्या दिशने हात जोडले. तर डिनर 'मातोश्री'वर करणार की बाहेर यावर आदित्य पुन्हा लाजत म्हणाले की, डिनर मातोश्रीवरच करणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. दहावीच्या विद्यार्थ्यांना इंटर्नल मार्कस मिळावे आणि दुष्काळाबाबत त्यांनी चर्चा केली. पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाय शोधला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. एसएससी बोर्डासाठी नव्या तुकडीची मागणी केली असून, पुढील वर्षी विद्यार्थ्यांना इंटर्नल मार्क मिळतील अशी आशा व्यक्त केली.

Web Title: Yuvasena chief Aditya Thackeray clarifies on dating with actress Disha Patani