आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 मे 2019

इन्स्टाग्रामवर युवासेना सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे बंधू वरूण सरदेसाई यांनी तशी मागणीच केली आहे. त्यांच्या या आग्रही मागणीला आदित्य ठाकरे कसा प्रतिसाद देताहेत ते हे आता पहावे लागेल.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगलं यश मिळाल्यावर आता शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना आणि भाजपची युती विधानसभा निवडणुकीतही कायम रहाणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जाहीर केल आहे. त्यामुळे सहा महिन्यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी युवासेना आक्रमक झाली आहे. आता तर थेट युवासेनेनं युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीच विधानसभा निवडणुक लढवावी अशी आग्रही भूमिका घेतली आहे.

'हिच वेळ आहे...हिच संधी आहे. लक्ष- विधानसभा २०१९!!' 'महाराष्ट्र वाट पहातोय.' अशा शब्दात समर्थन केले आहे. ठाकरे कुटुंबीयांतील अद्याप एकानेही निवडणूक लढविलेली नाही. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढण्याची जाहीर केले होते. पण, नंतर त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता.

इन्स्टाग्रामवर युवासेना सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे बंधू वरूण सरदेसाई यांनी तशी मागणीच केली आहे. त्यांच्या या आग्रही मागणीला आदित्य ठाकरे कसा प्रतिसाद देताहेत ते हे आता पहावे लागेल. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील कुणी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्येही नवचैतन्य निर्माण होईल असा दावा केला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuvasena chief Aditya Thackeray likely contest assembly election in maharashtra