कोकण पदवीधर निवडणुकीत विजय शिवसेनेचाच: आदित्य ठाकरे

रविंद्र खरात
शनिवार, 16 जून 2018

भाजपचे नाव न घेता चिमटा 
यापूर्वी शिवसेनेच्या मदतीने अनेकांनी निवडणूक जिंकल्या मात्र आता शिवसेनेची ताकद आणि सभागृह मधील संख्याबळ वाढविण्यासाठी विधान परिषद निवडणूक लढवीत आहोत, आमचा पालघरमध्ये पराभव नव्हे शिवसेनेचा नैतिकेचा विजय झाल्याचे मत व्यक्त केले .

कल्याण : यापूर्वी कोकण पदवीधर मतदार संघात शिवसेना ज्या उमेदवाराच्या बाजूने उभे राहायचे तो विजयी होत असे, मात्र आता शिवसेना आपली संख्या बळ वाढविण्यासाठी विधानपरिषद निवडणूक लढवीत असून कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत शिवसेनेचा विजय निश्चीत असल्याचा दावा, शिवसेना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

कोकण पदवीधर मतदार संघातून शिवसेनेतर्फे संजय मोरे निवडणूक लढवित आहे. मोरे यांच्या प्रचारासाठी कल्याण पूर्व मधील कशीश हॉटेलमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजन करण्यात आला होता यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, उमेदवार संजय मोरे, राजन विचारे गोपाळ लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्या सोबत आगळ्या वेगळ्या पदद्धतीने संवाद साधला यावेळी ठाकरे म्हणाले की पदवीधर मतदार संघातील निवडणूक किचकट असली तरी विद्यापीठ निवडणूक आपण जिंकल्याने ही सहज निवडणूक जिंकणार असल्याचे स्पष्ट करत मत व्यक्त करत मतदारापर्यंत कसे जायचे याचा कानमंत्र देत जर कार्यकर्ता कमी पडल्यास मला हाक द्या मी स्वतः येईल आणि काम करेल असे आश्वासन दिले. 

भाजपचे नाव न घेता चिमटा 
यापूर्वी शिवसेनेच्या मदतीने अनेकांनी निवडणूक जिंकल्या मात्र आता शिवसेनेची ताकद आणि सभागृह मधील संख्याबळ वाढविण्यासाठी विधान परिषद निवडणूक लढवीत आहोत, आमचा पालघरमध्ये पराभव नव्हे शिवसेनेचा नैतिकेचा विजय झाल्याचे मत व्यक्त केले .

पालघर लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी नव्हे , प्रत्येक निवडणूक अनेक कारणासाठी लढविली जाते  आमच्या पक्षाला स्वत:चे संख्याबळ वाढवायचे आहे. यापूर्वी कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत यापूर्वी शिवसेना ज्याच्या बाजूने असायची त्याचा विजय व्हायचा. यावेळी स्वत:चे संख्याबळ वाढविण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरली अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना देत जळगाव येथे दलित मुलावर झालेल्या अत्याचारासंदर्भात ठाकरे यांची प्रतिक्रिया विचारली असता याविषयी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बोलतील असे सांगून प्रतिक्रिया  व्यक्त करण्याचे टाळले.

Web Title: Yuvasena leader Aditya Thackeray talked about Konkan election