बेस्टसाठी चिनी बॅटरीच्या बस खरेदीचा युवराजांचा हट्ट?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

मुंबई - चिनी बॅटरीवर चालणाऱ्या 10 कोटींच्या सहा बस खरेदी करण्याचा बेस्टचा विचार आहे. शिवसेनेच्या युवराजांचा त्यासाठी हट्ट असल्याची चर्चा बेस्टच्या वर्तुळात रंगली आहे.

मुंबई - चिनी बॅटरीवर चालणाऱ्या 10 कोटींच्या सहा बस खरेदी करण्याचा बेस्टचा विचार आहे. शिवसेनेच्या युवराजांचा त्यासाठी हट्ट असल्याची चर्चा बेस्टच्या वर्तुळात रंगली आहे.

चिनी बनावटीच्या बॅटरी असलेल्या बस पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जातात. अशा सहा बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्या खरेदी करण्यासाठी पालिका बेस्टला 10 कोटी रुपये देणार आहे. या बसच्या पुरवठ्याबाबत भारतीय कंपन्यांनीही पुढाकार घेतला आहे. किमती आणि पूर्वानुभवाच्या जोरावर ए. व्ही. मोटर्स आणि इम्पॅक्‍ट ऑटोमोटिव्ह सोल्युशन्स या दोन पुरवठादारांना प्राधान्य मिळाले आहे. त्यांनी दोन आणि चार बसचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे. या बस कुठे चालविणार, कशा चालविणार, त्यांच्या तांत्रिक बाजू आदी गोष्टींचे परीक्षण करून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या बस तांत्रिकदृष्ट्या योग्य असतील तरच त्या खरेदी केल्या जातील. त्यासाठी बेस्टचे दोन अभियंते या बसचे परीक्षण करण्यासाठी नेमण्यात आले आहेत. अशा बस खरेदी करण्यासाठी शिवसेनेच्या युवराजांचा आग्रह असल्याचे बोलले जात आहे. पालिकेने त्या खरेदी करण्यासाठी निधी देण्याची ग्वाही दिल्यानंतर बेस्टने खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे.

Web Title: Yuvraj insisted for China battery in BEST