झाकीर नाईकला "एनआयए'ची नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

मुंबई - वादग्रस्त धर्मप्रसारक झाकिर नाईकला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) चौकशीसाठी 14 मार्चला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नाईक याची बहीण नायला नुरानी हिची मंगळवारी चौकशी केली. नुरानीच्या संपत्तीबाबतची माहिती घेण्यासाठी ही चौकशी केली. नाईक आणि संबंधितांवर एनआयएने दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर नाईकच्या संस्थांना मिळालेल्या सुमारे 200 कोटी रुपयांच्या संशयित देणग्यांबाबत "ईडी'ने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी गेल्या महिन्यात नाईकचा विश्वासू सहकारी आमीर गाझदार याला अटक केली होती. 

Web Title: Zakir Naik NIA notice