झाकिर नाईकला "इडी'चे दुसरे समन्स

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

मुंबई - वादग्रस्त इस्लाम धर्मप्रचारक झाकिर नाईक याला सक्तवसुली संचालनालयाने(इडी) दुसरे समन्स बजावून या महिन्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची ईडीने मंगळवारी चौकशी केली होती. त्यात आयआरएफच्या संघटनात्मक रचनेबाबतची माहिती इडीने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाईकला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे दुसरे समन्स या पदाधिकाऱ्यांकडेच देण्यात आले. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) नाईक आणि इतरांवर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले होते. त्याच्या आधारावर "इडी'नेही नाईकवर गुन्हा दाखल केला होता.

Web Title: Zakir Naik second summons