झी व ऍन्ड टीव्हीवर गुन्हा दाखल करा

Sachin-Sawant
Sachin-Sawant

मुंबई - आचारसंहिताभंग व जाणीवपूर्वक प्रेक्षकांचा विश्वासघात करत असल्याप्रकरणी झी टीव्ही, ऍन्ड टीव्ही या वाहिन्यांचे प्रक्षेपण तत्काळ थांबवून "भाभीजी घर पर है', "तुझसे है राबता' या मालिकांचे निर्माते व कलाकारांसह भारतीय जनता पक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली.

सावंत म्हणाले की, निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षातर्फे सराईत गुन्हेगाराप्रमाणे वेळोवेळी आचारसंहितेचाभंग केला जात आहे; परंतु या वेळी संबंधित मालिकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी; तसेच सरकारतर्फे हाती घेण्यात आलेल्या अनेक योजनांची भलामण जाहिरातीप्रमाणे करण्यात आली आहे. याकरिता कुठेही जाहिरात म्हणून सूचना देण्यात आलेली नाही. लोकांची मानसिकता प्रभावित करून सत्ताधिकाऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा डाव यातून स्पष्टपणे समोर आला आहे. "पेड न्यूज' हीदेखील याच प्रकारात मोडते. या प्रकाराची नोंद घेऊन या वाहिन्यांचे प्रक्षेपण तत्काळ बंद करून वाहिन्यांचे मालक; तसेच मालिकांचे निर्माते आणि कलाकारांसोबतच भाजप आचारसंहिताभंगचा गुन्हा दाखल करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com