'झिरो'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

मुंबई - शाहरूख खान याच्या "झिरो' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटातील एका दृश्‍यामुळे शीख धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप झाला होता. हे दृश्‍य "व्हीएफएक्‍स' पद्धतीने बदलल्याची माहिती निर्मात्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात दिली. त्यामुळे खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तहकूब केली.

"झिरो' चित्रपटात एका दृश्‍यात शाहरूख खानने शीख धर्मीयांचे कृपाण परिधान केले आहे. हे शस्त्र धार्मिक विधीनंतरच बाळगता येते. शीख व्यक्‍तींनाच कृपाण धारण करता येते. "झिरो' चित्रपटात अर्धी विजार आणि बनियन, गळ्यात पैशांची माळ अशा अवस्थेत शाहरूखने कृपाण धारण केल्याचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्याला ऍड्‌. अमृतपालसिंग खालसा यांनी आक्षेप घेतला होता.

चित्रपटातून हे दृश्‍य वगळण्याचे निर्देश सेन्सॉर बोर्डाला द्यावे आणि शीख धर्मीयांच्या भावना दुखावल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशा मागणीची याचिका त्यांनी केली होती.

Web Title: Zero Movie Release Entertainment