या पाच ठिकाणी लागल्या ZP च्या निवडणुका..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 जानेवारीला मतदान

मुंबई : नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. यासंदर्भातील घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केलीये. 

श्री. मदान  यांच्या माहितीनुसार नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 

शिवसेनेबद्दल नवाब मलिक याचं मोठं वक्तव्य..
 

या सर्व निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2019 पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होईल. मतदान 7 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. मतमोजणी 8 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

निवडणूक कार्यक्रम

•    नामनिर्देशनपत्र सादर करणे- 18 ते 23 डिसेंबर 2019
•    नामनिर्देशनपत्रांची छाननी- 24 डिसेंबर 2019 
•    अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 30 डिसेंबर 2019
•    अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 1 जानेवारी 2020
•    मतदानाचा दिनांक- 7 जानेवारी 2020
•    मतमोजणीचा दिनांक- 8 जानेवारी 2020

Webtitle : Zilla Parishad elections declared in 5 ZP of maharashtra 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zilla Parishad elections declared in 5 ZPs of maharashtra