मुंबईतून एका अभिनेत्रीला ड्रग पेडलरसोबत रंगेहात पकडलं, नार्कोटिक ब्युरोची धडक कारवाई

सुमित बागुल
Sunday, 25 October 2020

ANI च्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार मुंबई झोनल युनिटकडून कारवाई करताना या दोघांकडून ९९ ग्राम गांजा हस्तगत करण्यात आला आहे

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल लक्षात घेऊन NCB कडून तपास अजूनही सुरु आहे. या तपासामध्ये अनेकांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं. अनेक ठिकाणी छापेमारी झाली. काही ड्रग्स पेडलर्सला अटक देखील केली गेलीये.

दरम्यान, आता NCB ने एक वेगळ्या केसमध्ये कारवाई करत एका टीव्ही अभिनेत्रीला NCB ने रंगेहात पकडलं आहे. सोबतच तिच्यासोबत एका ड्रग पेडलरला देखील ताब्यात घेण्यात आलंय. २४ ऑक्टोबर २०२० म्हणजेच काल नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडून ही कारवाई केली गेली यामध्ये अभिनेत्री प्रीतिका चौहान या लहान पडद्यावर काम करणाऱ्या अभिनेत्रीला रंगेहात पकडण्यात आलं आणि तिच्यासोबत एक ड्रग पेडलरला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रीतिका चौहान ड्रग पेडलरला भेटायला गेली असता ही कारवाई करण्यात आलीये.

महत्त्वाची बातमी : कोविडबाधित मातेच्या नवजात बालकांमध्ये जन्मजात अँटिबॉडी, नवजात बालकांची कोरोनावर मात

महत्त्वाची बातमी :  दसऱ्याचा मुहूर्त साधत कंगनाने पुन्हा संजय राऊतांना डिवचलं

ANI च्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार मुंबई झोनल युनिटकडून कारवाई करताना या दोघांकडून ९९ ग्राम गांजा हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये फैजल आणि टीव्ही अभिनेत्री प्रितिका चौहान यांना ताब्यात घेण्यात आलंय आणि कोर्टासमोर हजर करण्यात आलंय.

Zonal Unit apprehended two persons at Versova and succeeded in a seizure illegal things


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zonal Unit apprehended two persons at Versova and succeeded in a seizure illegal things