झोपु योजनेत घर देण्याच्या नावाखाली 130 जणांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

मुंबई - एमएमआरडीएने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत बांधलेल्या इमारतींमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली 130 नागरिकांची पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आई व मुलीला अटक केली.

मुंबई - एमएमआरडीएने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत बांधलेल्या इमारतींमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली 130 नागरिकांची पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आई व मुलीला अटक केली.

सुशीला नारायण शेट्टी (वय 53) व तिची मुलगी सुमन शेट्टी (वय 32) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या हाउसिंग विभागाने त्यांना सोमवारी अटक केली. कांजूरमार्ग येथील तक्रारदार सुधीर शेट्टी याच महिलेच्या इमारतीत राहायचा व या महिलेला 2012 पासून ओळखत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सुशीलाने स्वतःला समाजसेविका व सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ एरिया रिसॉर्स सेंटर (एसपीएआरसी) या संस्थेच्या सर्वेक्षण अधिकारी असल्याचे सांगायची. आपण निट्टी पासपोळी पवई, दिवा, मुंब्रा व कळवा येथील झोपड्यांचे सर्वेक्षण केले असून या झोपड्यांचे रस्ता रुंदीकरण व लोहमार्ग विस्तारांतर्गत एमएमआरडीए या झोपड्या तोडणार असून या झोपडपट्टीवासीयांना कांजूरमार्ग येथील कर्वेनगर व नाहुर या ठिकाणी झोपटपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत 270 चौरस फुटांचे घर दिले जाणार असल्याचे तिने सांगितले, तसेच पवई झोपडपट्टी परिसरात सहा लाख रुपयांना झोपडी घेण्याचे सुधीरला सुचवले होते.

Web Title: zopu scheme home cheating crime