"मायफा'मध्ये हेल्थ स्टार्टअप्सना उत्स्फूर्त प्रतिसाद 

"मायफा'मध्ये हेल्थ स्टार्टअप्सना उत्स्फूर्त प्रतिसाद 

पुणे - बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन शर्यतीत "मेक युवरसेल्फ फिट अगेन' (मायफा) अंतर्गत स्वतंत्र दालन तयार करण्यात आले होते. "हेल्थ अँड वेलनेस'मध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करणाऱ्या स्टर्टअप्स आणि ऍप्ससाठी हे हक्काचे दालन ठरले. यात सहभागासाठी अर्ज केलेल्या दोनशेपैकी सर्वोत्तम सहा स्टॉर्टअप्सना "मायफा स्टार्टअप्स झोन'मध्ये सादरीकरणाची संधी मिळाली, त्याला तंदुरुस्तीबाबत अत्यंत जागरूक असलेल्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'तर्फे (डीसीएफ) बजाज अलियांझ पुणे हॉफ मॅरेथॉन रविवारी आयोजित करण्यात आली होती. म्हाळुंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेत "मायफा' हे आरोग्याशी संबंधित स्वतंत्र दालन उभारण्यात आले होते. या दालनात सहभागी होण्यासाठी "हेल्थ अँड वेलनेस'मधील दोनशे स्टार्टअप्स आणि ऍप्सनी अर्ज केला होता. त्यातील सहा विजेत्यांना त्यांचे उत्पादन हजारोंच्या संख्येने जमलेल्या फिटनेसबद्दलच्या उत्साही लोकांसमोर सादर करण्याची संधी मिळाली. "बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन' शर्यतीच्या "फिनिश लाइन'जवळ हा "मायफा झोन' उभारण्यात आला होता. हे नावीन्यपूर्ण स्टार्टअप्स या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी पर्याय पाहणाऱ्या वेगवेगळ्या गुंतवणूकदारांसमोर मांडण्यात आले. 

"इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी'च्या (आयआयटी) काही माजी विद्यार्थ्यांनीदेखील नवीन उत्पादने निर्माण केली. स्टेथोस्कोप ते पोर्टेबल ईसीजी मॉनिटरपर्यंतच्या वेगवेगळ्या उत्पादनांचा त्यात समावेश होता. घरच्या घरी बसून नियमितपणे हृदयाची निरीक्षणे अचूकपणे सहजासहजी नोंदवता येतील, अशी सुविधा रुग्णांना उपलब्ध करून देणारे उत्पादनही यात होते. 

"मायफा स्टार्टअप्स झोन'साठी निवडलेले स्टार्टअप ः 
1. "ऑन द रन' - फिटनेससाठी शंभर टक्के नैसर्गिक, स्वच्छ, कोणत्याही "प्रिझर्व्हेशन'पासून मुक्त असे पौष्टिक खाद्यपदार्थ बनवते. 

2. "फिटहल्क' ः "सब्सक्रिप्शन बेस्ड फूड सोल्यूशन' देणारी ही कंपनी आहे. निरोगी खाण्यावर भर देते. 

3. न्यूमॅन्स फाइटोविज्ञान - हे एक स्टार्टअप आहे. त्याने पर्यायी औषध किंवा टॅब्लेट विकसित केले आहे. हे पूर्व-वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणीकृत असून, "आयुष' आणि "एफडीए'ची मान्यता याला आहे. केमोथेरपीच्या दुष्परिणामांचा सामना करण्यासाठी संभाव्यपणे हे वापरले जाईल. 

4. हेल्थ ऑन वे (यापूर्वी मेड्‌स ऑन द वे) - गुंतागुंतीचे आजार आणि आरोग्य व्यवस्थापनातील कार्य 

5. सुश्रुत डिझाइन ः पेटंट मिळविलेले तंत्रज्ञान असलेले हे स्टार्टअप आहे. रक्ताभिसरणात अचानक येणाऱ्या अडथळ्याला प्रतिबंध करणारे हे तंत्रज्ञान आहे. 

आरोग्याच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्टार्टअप्सना बळ देण्यासाठी हा स्वतंत्र "मायफा स्टार्टअप्स' झोन तयार केला होता. देशातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहील आणि त्यांना निरोगी आयुष्य जगता येईल, या उद्देशाने तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्यात आले होते. स्टार्टअप्सना अशी संधी निर्माण करून दिल्याबद्दल नावीन्यपूर्ण सेवा देणाऱ्या कंपन्यांनी "डीसीएफ'चे आभार मानले. 

"न्यूमॅन्स फायटोविज्ञान'चे संस्थापक प्रेम पांडे म्हणाले, ""फिटनेसबाबत उत्साही असलेल्या इतक्‍या मोठ्या संख्येच्या लोकांना एकाच वेळी भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही "डीसीएफ' आणि "मायफा स्टार्टअप झोन'चे आभारी आहोत. आमच्या उत्पादनांसाठी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, पुढच्या वर्षी पुन्हा आम्ही या उपक्रमाचा भाग होण्याची अपेक्षा करतो.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com