Video : सुदृढ आरोग्याची हास्य चळवळ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 January 2020

हास्य क्‍लबचे महत्त्व जाणून त्यात सहभागी होणाऱ्यांचे प्रमाणदेखील दिवसेंदिवस वाढत आहे. यात विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा समावेश अधिक आहे. क्‍लबची स्थापना अचानक भेटलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांच्या चर्चेतून झाली आहे. हसण्यामुळे रक्तसंचार वाढतो. डॉक्‍टरही रुग्णांना मनमोकळेपणे हसण्याचा सल्ला देतात. कारण, त्यांना माहीत आहे की, माणूस चिंताग्रस्त असेल तर रोग बळावू शकतो. त्यातून हास्य क्‍लबची श्रुंखला वाढू लागली आहे. 

ततची धावपळ आणि तणावामुळे चिडचिड होते. यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्यावर औषध नव्हे तर हास्य हाच एकमेव उपाय असल्याचे अनेक जण मान्य करीत आहेत. त्यासाठी सकाळी-सकाळी मोकळ्या मैदानात मनसोक्त हसण्याचे आवाज कानावर येत असल्याचे चित्र बघायला मिळते. त्रिमूर्तीनगरातील एनआयटी गार्डन फ्रेण्ड्‌स सर्कलचा हास्य क्‍लब त्यातीलच एक. या क्‍लबच्या सदस्यांच्या ठेक्‍यावर अनेक जण हास्याचे कारंजे उडवीत असतात. त्यामुळेच या हास्य क्‍लबने आपली आगळीवेगळी ओळख परिसरात निर्माण केली आहे.

हेही वाचा - Video : पारंपरिक खेळाच्या माध्यमातून 'फिटनेस'

हास्य क्‍लबचे महत्त्व जाणून त्यात सहभागी होणाऱ्यांचे प्रमाणदेखील दिवसेंदिवस वाढत आहे. यात विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा समावेश अधिक आहे. क्‍लबची स्थापना अचानक भेटलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांच्या चर्चेतून झाली आहे. हसण्यामुळे रक्तसंचार वाढतो. डॉक्‍टरही रुग्णांना मनमोकळेपणे हसण्याचा सल्ला देतात. कारण, त्यांना माहीत आहे की, माणूस चिंताग्रस्त असेल तर रोग बळावू शकतो. त्यातून हास्य क्‍लबची श्रुंखला वाढू लागली आहे.

Image result for hasya club

त्रिमूर्तीनगर गार्डनमध्ये 15 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा पहिला हास्य क्‍लब आहे. तत्पूर्वी, ही संकल्पनाही या भागात रूजली नव्हती. आता या गार्डनमध्ये चार ते पाच छोटेखानी गट आहेत. ते आपल्या सोयीनुसार एकत्रित होऊन हास्यकल्लोळ करीत असतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ होत असून, गार्डनमध्येही विविध भागांत काही वेळाच्या अंतराने हास्याचे कारंजे उडतात, असे जन्नार्दन कडू यांनी सांगितले. 

आमच्या क्‍लबचे वैशिष्ट्य म्हणजे मनोरंजन, वाढदिवस आणि गेट टू गेदर आयोजित करणे होय. वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व सदस्यांच्या वाढदिवसाच्या तारखेची नोट काढण्यात येते. ती नोट सर्वच सदस्यांना दिली जाते. त्यानुसार वर्षभर क्‍लबच्या सदस्याचे वाढदिवस साजरे केले जातात. परिवारासोबत वाढदिवस साजरे होत असताना मित्रांसोबत वाढदिवस साजरे करण्याचा आनंद वेगळाच असतो, असे सत्कारमूर्ती ज्ञानेश्‍वर भेंडे यांनी वाढदिवस साजरा केल्यानंतर सांगितले. तसेच मारोतराव जंवजाळ, सुरेश कोल्हे, किशोर हाडे, प्रमोद साखळे, बी. सी. खोब्रागडे, सुरेश सिंग राठोड, वामनराव खुणे यांनीही हास्य क्‍लबच्या विविध आठवणींना उजाळा दिला.

Related image

सदस्यांचा व्हॉट्‌सऍप ग्रुप

हास्य क्‍लबच्या सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जनार्दन कडू हे रोज "चिरायता' आणि "गिलोयो' या दोन झाडांची पाने गार्डनमध्ये आणतात. सर्वच सदस्य ती पाने न चुकता हक्काने मागून खातात. त्यांचा तो रोजचा उपक्रम आठ वर्षांपासून सुरू आहे. सदस्यांचा व्हॉट्‌सऍप ग्रुपही तयार केलेला आहे. सदस्यांपैकी कोणी अनुपस्थित असल्यास त्याची विचारपूसही कायम होत असल्याने त्यांच्यात आपुलकी निर्माण झालेली आहे, असे प्रकाश महाजन यांनी सांगितले.

अधिक वाचा - मानसिक आरोग्याविषयी पुरेशी जागरुकता नाही

सगळ्यांचे हास्य पळून गेले 
धावपळीच्या जिवनाने जणू सगळ्यांचे हास्य पळून गेले आहे. या गोष्टीचे महत्त्व जाणून हास्य क्‍लब निर्माण झाले आहेत. त्यामुळे हसणे-खिदळणे विसरलेल्या मंडळींनी क्‍लबमध्ये जाऊन पुन्हा हसणे शिकावे आणि आपले जीवन मधूर बनवावे, हाच त्यामागचा उद्देश आहे. 
- जन्नार्दन कडू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about hasy club