लाइफस्टाइल कोच : पावसाळ्यात घ्या स्वतःची काळजी

डॉ. मनीषा बंदिष्टी
मंगळवार, 14 जुलै 2020

पावसाळ्यात आरोग्याच्या विविध तक्रारीही सुरू होतात. अन्न आणि पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचं प्रमाण वाढते. योग्य, सकस आहार घेतल्यास आजारी पडण्यापासून रक्षण होते. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप, अपचन, जुलाब आदी तक्रारी वाढतात. यामागे अस्वच्छता आणि पुरेसे प्रतिबंधात्मक उपाय नसणे ही कारणे आहेत. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, टायफॉइड, हिपॅटायटिस ए आदी आजार पसरतात. त्याचप्रमाणे ई-कोलाय, साल्मोनेला, शिगेला आदी जिवाणूंचा संसर्गही वाढतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उलट्या, जुलाब, ओटीपोटात वेदना, ताप आणि थंडी वाजणे ही संसर्गाची सर्वसामान्य लक्षणे आहेत. दमटपणा आणि कमी तापमानामुळे घरगुती माशांनाही प्रजोत्पादन करण्यास अनुकूल वातावरण तयार होते. माशा कचऱ्यावर जाऊन बसतात आणि त्यांच्या पायाला टायफाईड, कॉलरा, गॅस्टोएन्टेरिटिसिस आदी आजारांचे जिवाणू चिटकतात. तिथून त्या घरातील पृष्ठभाग किंवा खाद्यपदार्थांवर येऊन बसतात. त्यातूनही आजारांचा प्रसार होतो.

पावसाळ्यातील स्वच्छतेची काळजी
वैयक्तिक स्वच्छता

स्वतःचे शरीर, केस, कपडे स्वच्छ ठेवावेत. नखे वेळेवर कापावीत. स्वयंपाक करताना हेअर नेटचा वापर करावा. आजारी असताना स्वयंपाक करू नये. स्वयंपाकघराचे वर्षातून दोनदा निर्जंतुकीकरण करून घ्यावे.

हातांची स्वच्छता
स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीने कोणत्याही अन्नपदार्थांना हात लावण्यापूर्वी स्वच्छ धुवावेत. सध्याच्या कोरोनाच्या काळात हातांची स्वच्छता महत्त्वाची आहे.

परिसराची स्वच्छता
स्वयंपाकघर, आसपासचा परिसर स्वच्छ असावा. स्वयंपाकासाठी स्वच्छ भांडी वापरावीत. खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी झाकून ठेवावेत.  

खाद्यपदार्थांची स्वच्छता
स्वयंपाक करण्यापूर्वी भाज्या, फळे, मटन आदी व्यवस्थित धुवून घ्यावेत, स्वच्छ जागेवर ठेवावेत. भाज्यांच्या सालीच्या खालच्या भागातच पोषक घटक असल्याने ती काढणे टाळावे. आवश्‍यक वाटल्यास बाहेरील पातळ साल काढावी. 

खाद्यपदार्थांचा साठा
खाद्यपदार्थ कायम व्यवस्थित झाकून ठेवावेत. फळे फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी स्वच्छ करून सामान्य तापमानाला येऊ द्यावीत. अन्यथा ती विषारी होतात. 

दिवसाअखेरची स्वच्छता
स्वयंपाकानंतर सर्व भाग स्वच्छ करावा. किचन ओटा साबणाच्या पाण्याने स्वच्छ करावा.

पेस्ट कंट्रोल
उंदीर, घूस, कीटक जिवाणू पसरवतात. त्यामुळे वर्षातून दोनदा पेस्ट कंट्रोल करावे.

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr manisha bandisthi on Take care of yourself in the rain

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: