इनर इंजिनिअरिंग - गोंधळमुक्त मन : एक कल्पवृक्ष

Sadguru
Sadguru

तुमची पाच ज्ञानेंद्रिये आकलन करतात ते सर्वकाही स्वाभाविकपणे तुमच्या मनामध्ये नोंद होते. तुमच्याकडे त्याला पर्याय नाही. प्रत्येक आवाज, प्रत्येक गंध, प्रत्येक चव, प्रत्येक संवेदना, प्रत्येक दृश्य तुम्ही आकलन करता ते तुमच्या मनामध्ये आहे. प्रश्न एवढाच आहे की, तुम्हाला ते पाहिजे तेव्हा आठवण्याची क्षमता आहे का? उदा. तुम्ही तुमच्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला भेटता तो तुमच्या समोर उभा आहे, तरी तुम्हाला त्याचे नाव आठवत नाही - ही बुचकळ्यात टाकणारी स्थिती नाही का? नंतर काही वेळाने तुम्हाला त्याचे नाव लक्षात येते, तेव्हा त्याचा काहीही उपयोग नसतो. बरोबर ना?

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशा गोष्टी तुमच्यासोबत होताना पाहिलेय का तुम्ही? तुम्हाला त्याची गरज असते, तेव्हा ते येत नाही. तुम्हाला त्याची आवश्यकता नसते, तेव्हा त्या येतात. याचा अर्थ ते तुमच्या मनामध्ये निश्चितच आहे, पण फक्त ते अस्ताव्यस्त आहे; कारण सर्वकाही तुम्ही गोंधळलेल्या स्थितीतून हाताळत आहात. मी गोंधळलेल्या अवस्थेतून म्हणतो, तेव्हा जगण्याचा सर्वांत गोंधळलेला मार्ग म्हणजे चिंता करणे. एकाग्र होण्यासाठी अस्वस्थ होऊ नका. आयुष्यात जरा निवांत व्हायला शिका. तुम्ही करत आहात, त्यावर तुमचे प्रेम असेल, तर तुम्ही पाहाल; काही गरजेचे आहे ते सर्वकाही स्वाभाविकपणे तुम्ही समजून घेऊ शकाल. तुमच्या अभ्यासावर किंवा कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, तुम्ही करत आहात त्याची उपयुक्तता तुम्ही पाहिली, ते मजेत करत असाल तर तुम्ही पाहाल की, कोणत्याही गोष्टीचे आकलन करणे स्वाभाविकपणे तुम्हाला जमेल. प्रत्येकाकडे ती क्षमता आहे. तुम्ही बळजबरीने एकाग्र होण्याचा प्रयत्न केल्यास अगदी सहज सोप्या गोष्टीही चुकता. तुम्ही अस्वस्थ असता, तुमच्या कारची चावी तुमच्या हातात असूनदेखील तुम्ही ती घरभर शोधत बसता. असे घडलेय का तुमच्यासोबत?

तुम्ही अस्वस्थ होता, तुमचे मन अस्ताव्यस्त होते. तुम्ही ग्रंथालयात जाता, समजा तिथे लाखो पुस्तकांचा खच करून ठेवलेला असेल, तर तुम्हाला हवे असलेले पुस्तक सापडू शकेल का? परंतु सगळी पुस्तके व्यवस्थित, क्रमवार यादीत लावून ठेवलेली असल्यास असेल  तुम्ही डोळे बंद करूनसुद्धा तुम्हाला पाहिजे ते पुस्तक शोधू शकता. हा व्यवस्थितपणा तुमच्या मनामध्ये असणे आवश्यक आहे. केवळ चिंतेमुळे तुमचे मन गोंधळून गेले आहे. तुम्ही अस्वस्थ आहात आणि त्याबद्दल तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण आता या क्षणी तुमचा आनंद हा आज तुमच्या आयुष्यात काय घडेल यावर अवलंबून आहे.

तुम्ही खूश आहात. तुम्ही एक आनंदी व्यक्ती आहात, तर कधीच तुम्ही अस्वस्थ होणार नाही; कारण तुम्हाला माहीत आहे की आज काहीही घडले तरीही आतून तुमची अवस्था बदलणार नाही. मग बाहेरील परिस्थितीच्या कळकळीपोटी तुम्ही कार्यरत असता. तुमच्या कार्यातून तुमचे जीवन घडवण्याचा प्रयत्न करीत नाही. म्हणून चिंतामुक्त व्हायचे असल्यास सर्वांत प्रथम बाहेरील गोष्टींवर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या प्राकृतिक स्वभावानेच शांत आणि आनंदी मनुष्य कसे होता येईल, हे शिकले पाहिजे. तुम्ही अशी स्थिती बाणवता, तेव्हा तुमचे मन सुंदर उपकरण बनतं तुमचा एक चांगला मित्र बनते...

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com