चेतना तरंग : रिक्तपूर्णतेतील अर्थपूर्णता...

sri sri ravi shankar
sri sri ravi shankar

तुम्हाला कोणीतरी किंवा काहीतरी आवडत नाही, असा एक भास होतो आणि तोच तुम्हाला निष्ठुर बनवतो. तुमच्यातील ही निष्ठुरता मुलायम व्हायला, नाहीशी व्हायला खूप काळ जावा लागतो. हा तुम्हाला खजिन्यापासून दूर ठेवणारा सापळा आहे. या भौतिक जगातील कुठलीही गोष्ट तुम्हाला पूर्ण समाधान देऊ शकत नाही. त्याचा बाहेर शोध घेणारे मन समाधानाचा शोध घेऊ लागले. तर त्याला असमाधानच मिळते आणि ते वाढीस लागते. तक्रारी आणि नकारात्मक भाव मेंदूला कठोर बनवतात. सजगतेवर पटल येते आणि नकारात्मक भाव खूप फुगवलेल्या फुग्याप्रमाणे अगदी शिगेला पोचतो. तेव्हा तो फुटतो आणि दिव्यत्वाकडे तुम्हाला परत आणतो. दिव्यत्वापासून तुमची सुटका नाही, तुम्ही काय निवडाल? नकारात्मक भावनेचा दूरचा मार्ग, की सकारात्मक भावनेचा जवळचा मार्ग? दिव्यत्वाचा उगम झाल्याबरोबर असत्याकडून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे, निर्जीव वस्तूपासून तेजस्वी तत्त्वाकडे असे बदल घडतात. हृदय कठोर असते तेव्हा गंमत येत नाही. तुम्ही गमतीचा अनुभव घेऊ शकत नाही.

  ध्वनीला ताणणे म्हणजेच संगीत  
  हालचालींना ताणणे म्हणजेच नृत्य 
  स्मित ताणणे म्हणजेच हास्य 
  मनाला ताणणे म्हणजेच ध्यान 
  जीवनाला ताणणे म्हणजेच उत्सव 
  भक्ताला ताणणे म्हणजेच देव 
  भावनेला ताणणे म्हणजेच अत्यानंद 
  रिक्तपणाला ताणणे म्हणजेच परमानंद 
रिक्तपणा हे भौतिक जग आणि आध्यात्मिक जग यामधील द्वार आहे. इथेच तुम्हाला आत्म्याचे स्वरूप कळते. तुम्हाला रिक्तपणा माहीत नसल्यास तुम्हाला अस्तित्वाचा आनंद समजू शकणार नाही. अस्तित्वाचा अनुभव घेण्याची कलाच रिक्तपणास कारणीभूत ठरते. रिक्तपणातून पूर्णत्वाची सुरुवात होते. रिक्तपणाची एक बाजू म्हणजे दुःख आणि दुसरी बाजू आनंद आहे. बुद्धाने हेच म्हटले आहे, ‘‘संपूर्ण जग म्हणजे दुःख आहे आणि आपल्याला मिळवायचा तो रिक्तपणा.’’

भक्ती
हेतू तुम्हाला तणावग्रस्त ठेवतो. पोकळ आणि रिक्त होणे म्हणजे सर्व हेतू सोडून देणे. तणावांमध्ये गहिरी विश्रांती मिळत नाही, पण भक्तीमुळे हेतू विरून जातो. हेतू तुम्हाला भविष्याकडे नेत असतो, पण परमानंद हा नेहमी वर्तमानात असतो. या सत्यात नित्य जागरूक असतो, तो खरा सुज्ञ. कधीकधी परमानंदाच्या स्थितीमध्ये एखादा हेतू उत्पन्न झाल्यास तो विनासायास फळास येतो.

तुमच्या प्रार्थनेचा स्वीकार व्हावा, यासाठी तीव्र आकांक्षेची आवश्यकता आहे. आकांक्षेमध्ये तीव्रता अधिक आणि ती सफल व्हायला जितका विलंब लागेल, तितका कृतज्ञता-भाव अधिक असेल. तीव्र आकांक्षा तुम्हाला भक्तीकडे घेऊन जाते. आकांक्षा तीव्र होण्यासाठी काल आणि कारण लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com