चेतना तरंग : गोष्ट रिकाम्या मनाची....

Ravishankar
Ravishankar

मन अस्वस्थ असल्यास उत्तर काहीही असले, तरी ते थाऱ्यावर येत नाही. तुमचे मन शांत असल्यास फक्त एक खूण मिळाली, तरी तुम्हाला उत्तर कळते. कारण, तुम्हीच सर्व उत्तरांचा स्रोत आहात. तुम्ही शांत असल्यास उत्तरे तुमच्यातूनच येतात. त्यासाठीच काही काळ निवांत बसणे गरजेचे आहे. एखाद्या अस्वस्थ माणसाला तुम्ही काहीही उत्तर दिले तरी तो म्हणेल, ‘‘ठीक आहे, पण...’’ आणि मग ते एकानंतर एक विषय बदलत राहतात. हे अशा मनाचे लक्षण आहे, ज्यात इतक्या कल्पना, संकल्पना भरलेल्या असतात की नवीन ज्ञान किंवा माहिती आत शिरायलाही जागा नसते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एका गुरू-शिष्याच्या बाबतीत असेच झाले. एक शिष्य गुरूकडे आला आणि तो एका पाठोपाठ एक प्रश्न विचारत राहिला, पण गुरूने दिलेल्या कोणत्याही उत्तरांनी त्याचे समाधान झाले नाही. शेवटी गुरू म्हणाले, ‘चला, आपण चहा घेऊ.’’ गुरू त्याच्या कपात चहा ओतू लागले. कप भरला तरी ते ओततच राहिले. कप पूर्ण भरून वाहू लागला. टेबलावर आणि जमिनीवर चहा पसरू लागला. शिष्याने विचारले, ‘‘गुरूजी, हे काय करताय, कप भरला आहे. चहा सगळीकडे पसरतोय, हे तुम्ही बघताय.’’ गुरू हसले आणि म्हणाले, ‘‘अशीच परिस्थिती तुझी आहे. तुझा कप इतका भरला आहे की, त्यात आणखी भरण्यासाठी जागाच नाहीये. परंतु, तुला आणखी हवे आहे. प्रथम तुझा कप रिकामा कर. जे आहे ते पिऊन टाक.’’

प्राचीन ऋषींनी सांगितले आहे, ‘श्रवण’, आधी ऐका आणि मग ‘मनन’ म्हणजे विचारमंथन करा. मग ते अंगीकारा. कुणीतरी काही म्हटले म्हणून त्यावर विश्वास ठेऊ नका. त्याचबरोबर कोणी काही म्हटलेले झिडकारूनही टाकू नका. गीतेतील सर्व ७०० श्लोक सांगून झाल्यावर श्रीकृष्ण म्हणतात, ‘‘विचाराचे स्वातंत्र्य, मताचे स्वातंत्र्य, विश्वास आणि श्रद्धेचे स्वातंत्र्य द्यायची गरज आहे.’’ म्हणूनच आधी ऐका आणि त्यावर विचारमंथन करा, मग तो तुमचा स्वत:चा अनुभव बनेल. मग तो सुज्ञपणा बनतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com