esakal | बीट आणि जवस खाल्ल्यानं वाढेल रोग प्रतिकारशक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

बीट आणि जवस खाल्ल्यानं वाढेल रोग प्रतिकारशक्ती

आयर्न, मॅग्नेशियम, झिंक, सेलेनिअम, फोलेट, ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि चांगल्या दर्जाची प्रोटिन्स यांचाही समावेश होतो. एक किंवा जास्त पोषकद्रव्ये समाविष्ट असलेले असेच काही पदार्थ.... 

बीट आणि जवस खाल्ल्यानं वाढेल रोग प्रतिकारशक्ती

sakal_logo
By
डॉ. मनीषा बंदिष्टी

रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असल्यास अनेक पोषकद्रव्ये रोज पोटात गेली पाहिजेत. त्यात प्रामुख्याने व्हिटॅमिन ए, बी, सी, डी आणि ई यांचा समावेश होतो. त्याचबरोबर आयर्न, मॅग्नेशियम, झिंक, सेलेनिअम, फोलेट, ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि चांगल्या दर्जाची प्रोटिन्स यांचाही समावेश होतो. एक किंवा जास्त पोषकद्रव्ये समाविष्ट असलेले असेच काही पदार्थ... 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बीटरूट 
- बीटरूटमध्ये आयर्न, फोलेट आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात, त्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. 
- आयर्न हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करते आणि कुपोषणाला प्रतिबंध करते. 
- फायबर्स, मँगेनीज, पोटॅशियम आदींसह आवश्यक पोषकद्रव्ये असतात. 
- अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. 
- पोषकदव्ये पचायला आणि द्रवरूपात शोषून घ्यायला सोपी असतात. 
- आपण बीटची पाने फेकून देतो, पण त्यांच्यात आयर्न, कॅल्शिअम, फायबर्स, व्हिटॅमिन ए, के, सी पोषकद्वव्ये असतात. 
- आपण ही पाने सॅलड्समध्ये वापरू शकतो, त्यावर ताज्या लिंबाचा रस पिळू शकतो. आयर्न शरीरात जाण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक असते. 
- पाने वाढत्या वयातली मुले आणि गर्भवती महिलासाठीही उपयुक्त असतात. 

पिंक सूप 
आवश्यक सामग्री : 
चिरलेले बीट दोन कप, एक बारीक चिरलेला कांदा, लसणाच्या तीन-चार पाकळ्या, व्हेजिटेबल स्टॉक किंवा पाणी, मीठ, मिरी, नारळाचे दूध अर्धा कप, ऑलिव्ह ऑईल एक टेबलस्पून. 
कृती : 
कढईत पाणी आणि चिरलेले बीटचे तुकडे घेऊन मऊ होईपर्यंत शिजवा. दुसऱ्या एका कढईत तेल घेऊन त्यात कांदा आणि लसूण थोडा वेळ परतून घ्या. शिजलेले बीटचे तुकडे मॅश करून कढईत ओता. पाणी किंवा व्हेजिटेबल स्टॉक, नारळाचे दूध, मीठ, मिरी घाला आणि मध्यम आचेवर शिजू द्या. गरमागरम सर्व्ह करा. 

जवस 
- जवसाला फ्लॉक्स किंवा लाइनसीड्स म्हणतात. 
- त्यांत आरोग्यासाठी पोषक घटक व अँटी-ऑक्सिडंट्स विपुल असतात. 
- त्यांच्यात ओमेगा-३ फॅटी ॲसिड, तंतूमय पदार्थ, विविध बी व्हिटॅमिन्स, पोषक मिनरल्स भरपूर असतात. हे सगळे घटक रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी महत्त्वाचे असतात. 

जवसाचे फायदे : 
- कर्करोगाचा धोका कमी : स्तनाचा, प्रोस्टेट, ओव्हेरियन आणि पोटाच्या कर्करोगाशी लढण्यासाठी उपयुक्त. 
- रक्तदाब कमी होण्यास मदत : जवसामुळे रक्तदाब कमी होऊन हृदयरोग कमी होण्यासही मदत होते. 
- कोलेस्टेरॉल कमी होते : रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते व हृदयाचे आरोग्य सुधारते. 
- वजन कमी होण्यात मदत : जवसात आरोग्यदायी तंतूमय पदार्थ भरपूर प्रमाणात असल्याने पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे तुम्ही कॅलरी कमी घेता आणि वजन कमी होते. 
- पाळीच्या समस्या कमी करते : पाळीतील अनियमितता दूर होण्यासाठी जवस मदत करते. मेनॉपॉजनंतरच्या काळातही महिलांना उपयोग होतो. 
- ते ग्लुटेनमुक्त असतात : इन्फ्लेमेटरी असलेल्या ग्लुटेनना जवस हा नैसर्गिक पर्याय आहे, कारण ते अँटी-इन्फ्लेमेटरी असते. ग्लुटेनचा त्रास किंवा सेलियाक रोग असलेल्यांसाठी जवस उत्तम. 
- त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त : जवसाच्या बियांमध्ये अँटी-एजिंग प्रॉपर्टीज असतात. त्यांच्यामुळे त्वचा मऊ, मॉइश्चरयुक्त होते, कोरडी पडत नाही. केसांना पोषक असलेली व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स त्यांच्यात भरपूर असल्याने केस बळकट बनतात. कोंडा कमी करण्यासाठी मदत होते. 
रोज दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासमवेत किंचित भाजलेले दोन टेबलस्पून जवस खाणे हा तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवा.

loading image
go to top