इनडोअर सायकलिंग कशासाठी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

इनडोअर सायकलिंग या दोन्हींसाठी खूप चांगला पर्याय आहे. घरातच सायकलिंग करून मिळविण्याचे फायदे व घ्यायची काळजी याबद्दल...

तुम्ही खूप जास्त उष्मांक जाळणाऱ्या आणि त्याच वेळी तुमचे नितंब, गुडघे आणि पावलांवर कमी कमी ताण देणाऱ्या हृदयसंबंधीच्या व्यायाम प्रकाराच्या शोधात असाल, तर इनडोअर सायकलिंग या दोन्हींसाठी खूप चांगला पर्याय आहे. घरातच सायकलिंग करून मिळविण्याचे फायदे व घ्यायची काळजी याबद्दल...

जॉन जी या दक्षिण आफ्रिकेच्या व्यावसायिक सायकलपटूने २० वर्षांपूर्वी जगाला 'स्पिनिंग' या संकल्पनेची ओळख करून दिली. त्याने जागेवर उभ्या असलेल्या बाईकमध्ये बदल करून तुम्ही जीममध्ये पाहत असलेल्या सायकलमध्ये तिला परावर्तीत केले. तिला समूहाच्या फिटनेस प्रोग्राममध्ये स्वरूप दिले आणि नाव दिले 'इनडोअर सायकलिंग'!.

Image may contain: 1 person, smiling, sitting and indoor

इनडोअर सायकिलंग म्हणजे काय? इनडोअर सायकलिंग ही एक ऑर्गनाइज ॲक्टिव्हिटी असून, तिचे स्वरूप ग्रुप फिटनेसचे आहे. या एकाच जागी उभ्या सायकलच्या मदतीने व्यायाम करणारे सहनशक्ती, ताकद, दमसास यांची कसोटी पाहणारे आणि मोठी तीव्रता असलेले प्रशिक्षण घेतात. एका बाईकमध्ये बदल करून तयार केलेल्या या सायकलमध्ये वजनदार फ्लायव्हिल, चेन ड्राइव्हच्या मदतीने मोठ्या घर्षणाचा अनुभव दिला जातो, जो तुम्ही रस्त्यावर सायकल चालवता त्याप्रमाणेच असतो. तुम्ही खूप जास्त उष्मांक जाळणाऱ्या आणि त्याच वेळी तुमचे नितंब, गुडघे आणि पावलांवर कमी कमी ताण देणाऱ्या हृदयसंबंधीच्या व्यायामप्रकाराच्या शोधात असाल, तर इनडोअर सायकलिंग या दोन्हींसाठी खूप चांगला पर्याय आहे. थोडी माहिती घेतल्यास तुम्हाला असे लक्षात येईल की, इनडोअर सायकलिंग हा दर आठवड्यातील सर्वाधिक आव्हानात्मक वर्कआउट आहे व तो करण्यात खूप आनंदही मिळतो.

Image may contain: 1 person, smiling

फायदे इनडोअर सायकलिंगचे

कमी दुष्परिणाम
इनडोअर सायकलिंग हा सर्वांत कमी दुष्परिणाम होणारा व्यायाम आहे. हाडांशी संबंधित आजारातून पुन्हा बरे होऊ पाहणाऱ्यांसाठी इनडोअर सायकलिंग हा सर्वोत्तम पर्याय आहे. योग्य पद्धतीने सायकलिंग केल्यास त्याचा नितंब आणि पावलांच्या जोडांवर येणारा ताण कमीत कमी असतो. अशा प्रकारच्या आजारातून बरे होत असो अथवा नसो, प्रत्येक व्यक्ती धावण्यासारख्या व्यायामातून होणारी दुखणी टाळण्यासाठी इनडोअर सायकलिंगाचा पर्याय निवडतात.

Image may contain: 1 person, sitting

स्नायूंची शक्ती वाढविण्यासाठी...
शरीरातील स्नायूंमधील ताकदीचा संदर्भ एखाद्या वस्तूवर सतत आणि मोठा काळ बल देण्याशी आहे. इनडोअर सायकलिंगमध्ये तुम्ही घर्षणाच्या विरोधात पॅडलिंग करता, तेव्हा तुमच्या पायांच्या स्नायूंची प्रतिकारशक्ती वाढते व यात क्वार्डिसेप्स, हॅमस्ट्रिंग व काफ या स्नायूंचाही समावेश असतो. या सर्व स्नायूंचा व्यायाम केल्यावर बाजूला असलेली हाडे, स्नायूबंध (टेंडन्स) आणि अस्थिबंध (लिगामेंट्‍स) यांची ताकद वाढण्यास मदत होते. यातून तुमच्या दैनंदिन हालचाली सुलभ होण्यासही मदत होते.

ताण कमी होतो
'रनर्स हाय' याबद्दल आपण ऐकले आहे. इनडोअर सायकलिंगमधून त्याच पद्धतीने शरीरातून ॲडेनालाइन (एक संप्रेरक) स्रवते व मन आनंदी करणारे एंडोर्फिन न्यूरोट्रान्समीटर शरीरातून बाहेर पडतात. एंडोर्फिनमुळे उत्साहाची भावना निर्माण होते, ताण कामी होतो व शरीराची रोगांविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती वाढते.

हृदयाच्या स्थायूंना बळकटी
सुदृढ व्यक्तींनी दर आठवड्याला १५० मिनिटांपर्यंत सरासरी तीव्रतेचे व्यायाम करावेत, असे एसीएसएम या संस्थेने म्हटले आहे. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आठवड्यातील पाच दिवस ३० ते ६० मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम किंवा आठवड्यातील तीन दिवस २० ते ६० मिनिटे तीव्र स्वरूपाचा व्यायाम करणे अपेक्षित आहे. इनडोअर सायकलिंगमुळे हृदयाच्या ठोक्यांचा दर ४५ ते ६० मिनिटांत तीव्र स्वरूपाच्या रेंजमध्ये राखला जातो. इनडोअर सायकलिंगच्या व्यायामामुळे हृदयाच्या धमन्यांशी संबंधित आजारांना कायमचे दूर ठेवता येते.

मांसपेशींचे सुदृढीकरण
इनडोअर सायकलिंगचे परिणाम तुम्हाला आरशा‍मध्ये दिसायला लागतात. तुमच्या मांसपेशींचे सुदृढीकरण हा तो फायदा आणि तुमच्या व्यायामाप्रती समर्पणाची पावती. त्यानंतर तुम्ही शरीरातील चरबी कमी केल्यावर त्याचा दुप्पट परिणाम जाणवू लागतो आणि व्यायामानंतरचा शीणही जाणवत नाही. सायकलिंगमुळे तुमचे पाय आणि पोटाचे स्नायू सुदृढ होतात, कारण सायकलिंग करताना हेच स्नायू सर्वाधिक वापरले जातात. तुम्हाला शरीराच्या वरील भागातील स्नायूही बळकट बनवायचे असल्यास सायकलिंगबरोबरच क्रॉस ट्रेनिंग वर्कआउटचाही अवलंब करणे गरजेचे आहे.

सिक्स पॅक ॲब्ज
सायकलिंगमध्ये तंत्र आणि पोश्‍चरला सर्वाधिक महत्त्व आहे. तुम्हाला अपेक्षित स्नायूंचा व्यायाम होण्यासाठी योग्य पोश्‍चर आवश्‍यक आहे. सायकलिंगमुळे पायाच्या महत्त्वाच्या स्नायूंबरोबरच पोटाच्या स्नायूंनाही चांगला व्यायाम मिळतो. रस्त्यावर सायकल चालवताना तुमच्या शरीराच्या वरच्या भागाला व्यायाम मिळत नाही. मात्र, स्टेशनरी सायकलिंगमध्ये शरीराच्या वरच्या बाजूला एक लय मिळते व तीच पायांपर्यंत पोचून सर्व शरीराचा व्यायाम होतो. थोडे वाकून व दोन्ही पायाने जोर लावत केलेले सायकलिंग पोटाचा मध्यभाग व त्याच्या दोन्ही बाजूच्या स्नायूंना चांगला व्यायाम देतो. या प्रकाराला 'रिदम रिलिज' असे म्हणतात. पोटाच्या या व्यायामाचे परिणाम तुम्हाला लगेचच दिसणार नाहीत, मात्र इनडोअर सायकलिंगमधून काही कालावधीनंतर ते दिसू लागतात. तुम्हाला तुमचे सर्व शरीर आकारात येत असल्याचे, टोन अप होत असल्याचे जाणवू लागते. यामध्ये तुम्हाला सिक्स पॅक देणाऱ्या स्नायूंचाही समावेश असतो.

मनःशक्तीचा विकास
सायकलिंगमुळे मानसिक आरोग्यासंदर्भात दोन महत्त्वाच्या गोष्टी घडतात.
१) वॉर्मअप आणि कुल डाउन हा रिलॅक्स होण्याचा उत्तम मार्ग आहे. तुमच्या शरीराला सायकलिंगमधून ताण देण्याआधी तुम्ही तुमचे डोळे बंद करा, थोडा व्यायाम करा आणि शारीरिक दमवणुकीच्या माध्यमातून तुमच्या भावनांना वाट मोकळी करून द्या.

२) सायकलिंगच्या माध्यमातून तुमच्यात 'मी हे करू शकतो' हा विश्‍वास निर्माण होतो. यातून

मानसिक क्षमतेतही वाढ होते. दिवस कसेही असोत, तुम्ही सायकलिंगचे तुमचे रुटीन चुकवू नका. कठिण प्रसंगांना मागे टाका आणि सहनशक्ती वाढविणारा हा व्यायामप्रकार सुरूच ठेवा. सायकलिंगमधून मानसिक स्वयंशिस्त वाढीस लागते आणि त्याचा उपयोग स्वनियंत्रण आणि आत्मविश्‍वासाची गरज असलेल्या आव्हानांच्या वेळी कामाला येतो.

उष्मांक जाळण्यासाठी
मध्यम वेग व तीव्रतेने एक तास सायकलिंग केल्यावर अंदाजे ५०० ते ६०० उष्मांक जळतात. सायकलिंगचा आनंद हा व्यायामप्रकार करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरही दिसतो. हा आनंद वजन कमी झाल्यामुळे चेहऱ्यावर आलेला असतो. तुमचा वेळ आनंदात घालविण्याबरोबर उष्मांक जाळण्याचा सायकलिंग हा उत्कृष्ट मार्ग आहे.

महेंद्र लोकरे, प्रशिक्षक, लाइफफिट क्लब, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahendra Lokre Coach LifeFit Club Pune indoor cycling

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: