तुम्ही काय खाता यावर बरचं काही अवलंबून!

पूजा मखीजा, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

सोनम कपूर, सुश्‍मिता सेन, दीपिका पदुकोण, गुल पनांग आणि विद्या बालन यांच्यामध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे पूजा मखीजा या न्यूट्रिशिअन. त्या या सर्व जणींना योग्य अन्न खाण्यात मदत करतात. या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्टने या स्टार कलाकारांना विवेकाने, दर दोन तासांनी व विचारपूर्वक खाण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही त्यांच्याशी मुलांच्या व विशेषतः खेळात करिअर करणाऱ्या मुलांच्या आहाराविषयी चर्चा केली.

सोनम कपूर, सुश्‍मिता सेन, दीपिका पदुकोण, गुल पनांग आणि विद्या बालन यांच्यामध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे पूजा मखीजा या न्यूट्रिशिअन. त्या या सर्व जणींना योग्य अन्न खाण्यात मदत करतात. या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्टने या स्टार कलाकारांना विवेकाने, दर दोन तासांनी व विचारपूर्वक खाण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही त्यांच्याशी मुलांच्या व विशेषतः खेळात करिअर करणाऱ्या मुलांच्या आहाराविषयी चर्चा केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तरुणांची फौज
तुमच्या आसपास असे कोणी पालक आहेत का, ज्यांना आपली मुले काय खातात, किती खातात आणि किती वेळा खातात याबद्दलची काळजी नसते? पालकांनी काळजी करणे अगदीच नैसर्गिक आहे, मात्र मखीजा म्हणतात, ''मुले पालकांपेक्षा अधिक स्मार्ट असतात. तुम्ही त्यांना समजावून सांगितल्यास त्यांना व्यवस्थित समजते. मग ते शिष्टाचार असोत, सभ्यता असो, भाषा असो वा सायकल शिकणे अथवा पोहण्याची कला. लहानपणी शिकण्याची क्षमता असते, त्यामुळेच तुम्हाला या गोष्टी बालवयात शिकविल्या जातात. अन्न व पोषणाच्या बाबतीतही हेच सत्य आहे. मुलांना आपल्या पूर्वजांप्रमाणे खाणे व घरातलेच अन्न खाणे या गोष्टींचे महत्त्व पटवून देण्यासाठी कठोर मेहनत घेण्याची गरज आहे, असे मला वाटते.''

Image may contain: one or more people, people eating, people sitting, table and food

पूजा मखीजा त्यानंतर घरात बनवले जाणारे पदार्थ रुचकर बनविण्यासाठी पालकांनी मेहनत घ्यावी, असे सांगतात. जंक फूड हेल्दी कसे बनवावे याबद्दल त्यांनी आपले पुस्तक 'एन फॉर नरिश ॲन्ड इट डिलीट ज्युनियर- चाइल्ड न्यूट्रिशन्स फॉर झिरो टू फिफ्टिन इअर्स'मध्ये ऊहापोह केला आहे. ''तुम्ही तुमच्या मुलांना 'नाश्‍ता व जेवणासाठी डाळ, रोटी, भाजी खा,' असे सांगू शकत नाही. खरेतर पालक असे सांगून थकूनही जातात. त्याऐवजी 'बुरिटो' का बनवू नये? डाळ, भात, भाजी, काही फ्लेवर्स आणि मसाले एकत्र करून रोल तयार करा. तुम्ही त्याला 'बुरिटो' म्हणा आणि पाहा तुमची मुले आनंदाने खातील. पालकांनी थोडे प्रयत्न आणि थोडे प्रयोग केल्यास व आकर्षक पद्धतीने 'पॅकिंग' केल्यास मुले घरात तयार केलेले पदार्थही आवडीने खातात, हे लक्षात येईल.

Image may contain: 1 person, smiling

शाळेत एखाद्या खेळामध्ये सहभागी होणाऱ्या मुलांचे डाएट काय असावे, असे आम्ही मखीजा यांना विचारले. त्यांनी हे स्पष्ट केले, की हा एक सर्वसामान्य सल्ला असेल, कारण योग्य डाएट प्लॅन मुलांचे वय आणि त्यांच्या लिंगावरही अवलंबून आहे. ''खेळणाऱ्या मुलांच्या शरीराची मोठ्या प्रमाणावर झीज होत असल्याने त्यांनी सामान्यपणे प्रोटीन्सचे अधिक प्रमाण असलेला आहार घ्यावा. प्रोटीन्स झीज भरून काढतात आणि अंगात चपळता राहील हे सुनिश्‍चित करतात. त्यांच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे प्रमाणही राखले गेले पाहिजे, अन्यथा त्यांना अनेक क्रॅम्प्स येऊन दुखणी लांबू शकतात. त्यातून त्यांच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळावर परिणाम होऊ शकतो. त्यांचे डायड्रेशन आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण राखलेच गेले पाहिजे, अन्यथा त्यांच्या खेळाचा वेग कमी होतो आणि स्नायूही दुखावू शकतात,'' असे त्या सांगतात. एक चांगला आणि समतोल आहार ज्यामध्ये मॅगनेशिअम आणि झिंकसारख्या खनिजांचा समावेश आहे, अत्यंत गरजेचा ठरतो.

Image may contain: 1 person, drink

प्रौढांसाठी काही
''शरीरातील साखरेचे प्रमाण राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दर दोन तासांनी खाणे सर्वोत्तम आहे. तुम्ही कमी प्रमाणात अनेकदा खाता, तेव्हा तुम्ही आपोआपच योग्य व पोषक अन्न घेता व विचारपूर्वक खाता. हा धडा कायम लक्षात ठेवा. तुम्ही धावण्याचा व्यायाम करीत असाल किंवा एखादा खेळ खेळत असल्यास थोडे दमाने घ्या. कारण, अनेकांना मी तीन ते पाच किलोमीटर चाललो, आता मी पिझ्झा, बर्गर, मफिन्स खाऊ शकतो असा समज करून घेतात. हे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही काही अंतर धावल्यानंतर तुमच्या शरीराची झीज होते. ती भरून निघण्यासाठी तुमच्या शरीराला पोषक घटक मिळायला हवेत आणि त्यासाठी तुम्ही परिपूर्ण, समतोल आणि मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, कार्बोहाड्रेड्स आणि खनिजे असलेला आहार घेतलाच पाहिजे. तुमच्या शरीराची काळजी घेणे तुमच्या कारची काळजी घेण्यासारखेच आहे.

पेट्रोलपेक्षा डिझेल जास्त मायलेज देते म्हणून तुम्ही गाडीत पेट्रोलऐवजी डिझेल टाकू शकता का? तुमचा आहार योग्य नसल्यास तुमचे शरीर चालेलच कसे? तुमच्या स्नायूंना आवश्‍यक प्रोटीन्स, कॅल्शिअम, योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यास तुम्हाला नीट धावता येणे अशक्य आहे. तुम्हाला दमल्यासारखे वाटणार किंवा तुमचे स्नायू ओढले जाणार...'' असे पूजा मखेजा स्पष्ट करतात.

न्यूट्रिशिअन तुम्हाला मोड आलेली कडधान्ये वाळवून त्याची पावडर खाण्याचा सल्ला देतात. '' हे तुमच्या पोळी किंवा भाजीमध्ये प्रोटिनची पावडर घालून खाल्ल्याप्रमाणे आहे. स्थानिक बाजारात वाटाणा आणि ब्राउन राइसच्या प्रोटीन पावडर मिळतात. तुमची पचनशक्ती योग्य नसल्यासही तुम्ही हे खाऊ शकता. तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्यानंतर अतिरिक्त प्रोटिन्स शरीरातून बाहेर फेकले जातात, अन्यथा त्यातून तुमच्या शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते व हे शरीरासाठी योग्य नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरातील प्रोटिनचे प्रमाण वाढवाल, त्या वेळी पाण्याचे प्रमाणही वाढवा. तसे न केल्यास तुमच्या किडनीवर प्रोटिन्स जाळून टाकण्याचा भार पडतो,'' असे मखीजा स्पष्ट करतात.

(शब्दांकन - अंबिका शाळिग्राम)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nutritionist pooja makhija write about how much and what to eat information marathi