इनर इंजिनिअरिंग  : सौदेबाजीरहित आयुष्य 

sadguru-isha-foundation
sadguru-isha-foundation

आयुष्यात तुम्हाला सर्वोत्तम सौदा हवा असल्यास सौदेबाजी करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला तुम्ही अशा स्थितीत घडवायला हवं, की तुमच्यासोबत व्यवहार करणारे लोक तुमच्या प्रेमात पडले पाहिजेत. ही काही एक युक्ती नाहीये. आवश्यकता असल्यास सौदा होईल, नसेल तर तो होणार नाही. सौदा हा दोन्ही व्यक्तींच्या कल्याणासाठी असतो, म्हणजे दोघांनाही त्याची गरज असली पाहिजे. या जगात जगण्यासाठी व्यवहार हे करावेच लागतात. काही व्यवहार वैयक्तिक असतात तर इतर काही वेगळ्या स्वरूपाचे. मात्र प्रत्येक व्यवहार हा तुमच्या आयुष्यावर काही ना काही प्रकारे प्रभाव टाकत असतोच.तुम्ही एका टॅक्सी ड्रायव्हर बोलत असाल किंवा तुमच्या बॉसशी किंवा तुमच्या पार्टीशी, किंवा तुमचा पती, पत्नी, मूल, तुमचा प्रत्येक व्यवहार तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकत असतो. परंतु समस्या ही आहे की, तुम्ही एक व्यवहार हा दुसऱ्यापेक्षा वरचढ मानता. एकात तुम्ही अधिक समरस होता आणि दुसऱ्यात कमी प्रमाणात. हे असं करून चालणार नाही. एक सार्थक जीवन जगण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. तुम्ही अवघ्या परिस्थितीच्या प्रेमात का पडत नाही? तुम्हाला त्या परिस्थितीत राहण्याची इच्छा आहे, तोपर्यंत तुम्ही ते जणू एक उत्कट प्रेमप्रकरण म्हणून का घडवत नाही? 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रेमप्रकरण म्हणजे काय? प्रेमप्रकरण म्हणजे बिनशर्त, संपूर्ण सहभाग आणि परिस्थितीनुसार जे गरजेचे आहे ते करणे. तुमचा सहभाग संपूर्ण नसेल तर मग तुम्ही एखाद्या व्यक्तीतून सोयीस्कर सौदा करण्याचा प्रयत्न कराल. म्हणजे याचा अर्थ अगदी खुळचट लोकांना तुम्ही गाठलं पाहिजे. शहाणी माणसं तुमच्या खुळ्या सौद्यांच्या जाळ्यात कधीच फसणार नाहीत. तुमच्यापेक्षाही शहाण्या माणसांशी तुमची गाठ पडली तर तुम्हाला फायदेशीर असा सौदा करणं मुश्कील होईल.तुम्ही स्वतःला त्यात झोकून दिलं, आणि दोघांनाही तो सौदा कसा फायदेशीर ठरेल यावर भर दिला, तर मग योग्य वेळी तो घडून येईल. हो, हे सुद्धा खरंय, सौदा अनेक बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो, बाजारपेठ, आर्थिक स्थिती, जागतिक परिस्थिती वगैरे. तुम्ही आतून स्थिर असाल, आणि तुमच्यापासून जे काही शक्य आहे ते तुम्ही करत आहात, तर मग तुमच्या कुवतीनुसार ते घडून येईल. तुम्हाला शक्य नाही, असंही घडणार नाही. तुम्ही तुमचं डोकं फोडलं तरी ते होणार नाही, पण काही हरकत नाही. एकूणएक सगळं काही करणारा एक सुपरमॅन व्हायची तुम्हाला गरज नाही. तुम्ही करू शकता, ते तुम्ही केलं नाही, तर मग ती एक मोठी अडचण होईल, आणि इथंच तुम्ही कमी पडाल.एकामागून एक, अधिकाधिक सौदे कसे मिळवता येतील याची चिंता करत बसू नका. स्वतःला त्यात पूर्णपणे कसं झोकून देता येईल हे आधी शिकून घ्या, जे ती परिस्थिती उत्तमरीत्या हाताळण्यासाठी एक सर्वोत्तम गोष्ट असेल. आणि मग तेव्हा, लोकं त्याचा स्वीकारही करतील, त्यांना ते हवं असेल तर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com