इनर इंजिनिअरिंग : अपेक्षांच्या पलीकडचे नातेसंबंध 

sadguru-isha-foundation
sadguru-isha-foundation

मनुष्यांना नातेसंबंधांची गरज भासतेच का? नातेसंबंधांचे स्वरूप काहीही असो, मुलभूतपणे तुम्हाला तुमची गरज पूर्ण करायची असते. आणि या गरजा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा अनेकविध स्वरूपाच्या असू शकतात. आपण प्रस्थापित केलेल्या नात्यांबद्दल आपण पुष्कळ दावे करू शकतो, मात्र त्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण न झाल्यास ते नाते संबंध बिघडू शकतात. 

माणसांमध्ये या गरजा निर्माण झाल्या आहेत एक प्रकारच्या अपुरेपणाच्या भावनेतून. लोक नातेसंबंधांमध्ये गुंतताहेत; आतून एक प्रकारची पूर्णत्वाची भावना अनुभवण्यासाठी. आपलं हे जीवन, ते स्वतःच एक परिपूर्ण अस्तित्व आहे, तर त्याला का अपूर्ण वाटतं? दुसऱ्या एका जीवनाशी जवळीक साधून स्वतःला परिपूर्ण करण्यासाठी का धडपडत आहेत? याचं मुलभूत कारण, आपण आपल्या अस्तित्वाचा सर्वांगानं, परिपूर्ण ठाव घेतलेला नाही. हा मूळ मुद्दा असला तरी, नाते-संबंधांची प्रक्रिया क्लिष्ट आणि गुंतागुंतीची असते. कारण त्यात भरमसाठ अपेक्षा असतात. 

नातेसंबंधांचे व्यवस्थापन करायचा प्रयत्न कराल, तर त्याचा १०० टक्के तुम्हाला ठाव लागणार नाही. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेत त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत राहिलात, तर तुम्ही वेडावून जाल. काही प्रमाणात तुम्ही हे केलं पाहिजे, परंतु हा काही एका सुंदर नातेसंबंधाचा मूलाधार नाही. दुसऱ्या व्यक्तीतून आनंद पिळून काढण्यासाठी तुम्ही नाते संबंध प्रस्थापित करत आहात आणि ती व्यक्ती सुद्धा तुमच्यातून आनंद पिळून काढत असेल, तर काही काळानं हे नातं दुःखदायक ठरेल. 

तुमचं जीवन आनंदाचा पाठलाग न बनता तुमच्या आनंदाची अभिव्यक्ती होईल, तर नातेसबंध स्वाभाविकपणे सुंदर होतील. म्हणून नातेसंबंध तुमच्या आयुष्यातील सर्व पातळींवर उत्तमरित्या कार्यरत व्हायचे असतील, तर तुमचं जीवन आनंदाच्या पाठलागातून आनंदाच्या अभिव्यक्तीत बदलायला हवं. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आता सध्या, तुमचं शरीर, मन, भावना आणि आणखीन खोलवर, तुमची प्राणऊर्जा अशा स्थितीत आहेत, की तुम्हाला अजूनही नातेसंबंधांची गरज भासते. तुमचं शरीर नातेसंबंधांच्या शोधात असल्यास आपण त्याला लैंगिकता म्हणतो. तुमचं मन संबंधांच्या शोधात जात असल्यास आपण त्याला सहवास म्हणतो, तुमच्या भावना संबंधांच्या शोधात जात असल्यास आपण त्याला प्रेम म्हणतो. तुमच्या प्राणऊर्जा संबंधांच्या शोधात जात असल्यास आपण त्याला ‘योग’ म्हणतो. तर हा सगळा खटाटोप कशाशी तरी आणि कुणाशी तरी एक होण्यासाठी आहे, कारण ज्या स्थितीत तुम्ही सध्या आहात त्यात तुम्हाला अपूर्ण वाटतं. 

योगाची संपूर्ण प्रणाली यासाठीच आहे. वास्तविक ‘योगा’चा अर्थ ‘मिलन’ किंवा ‘ऐक्य’ आहे. तर कुठल्याही नातेसंबंधामागील जी काही उत्कंठा असेल, खरोखर वैश्विक ऐक्य कधीच तुम्ही अनुभवू शकणार नाही. पण तुमच्या सभोवतालची सृष्टी तुम्ही तुमचाच एक अविभाज्य अंग म्हणून अनुभवल्यास तुमची इथं जगण्याची तऱ्हा पूर्णतः वेगळीच असेल. आणि आता नातेसंबंध तुमच्या गरजा भागविण्यासाठी नव्हे, तर फक्त इतरांच्या गरजा कशा पूर्ण करता येतील यासाठी सतत प्रयत्नशील राहाल, कारण तुमच्या स्वतःच्या अशा काही गरजा आता राहिल्या नाहीत. 

एकदा तुमच्यातील सक्तीपूर्ण वृत्ती संपल्या आणि तुम्ही करत असलेली प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक करता, तेव्हा नातेसंबंध धडपड, तृष्णा न राहता वरदान ठरतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com