चेतना तरंग : मन आणि काळ 

ravishankar
ravishankar

मन आणि वेळ हे एकमेकांशी संबंधित आणि एकमेकांवर अवलंबून आहेत. दिशा, काळ आणि मन ही तीन तत्त्वे आहेत. दिशा म्हणजे अंतरिक्ष, काळ म्हणजे वेळ आणि मन म्हणजे मन. ही सगळी तत्त्वे एकमेकांना जोडलेली आहेत. दिशा आणि काळ यांचा परस्पर संबंध आहे, अंतरिक्ष आणि काळ एकमेकांवर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ. पृथ्वीवरच्या एक दिवसाचा काळ हा चंद्रावरच्या अनेक दिवसांबरोबर असतो. तुम्ही गुरूग्रहावर असल्यास मानवी एक वर्षाचा काळ हा गुरूग्रहावरच्या एक महिन्याच्या कालावधी इतका असतो. गुरूग्रहावरचे एक वर्ष हे पृथ्वीच्या १२ वर्षांच्या बरोबरीचे असते. कारण गुरूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करायला १२ वर्षांचा काळ लागतो. त्याचप्रमाणे तुम्ही शनी ग्रहावर गेलात, तर मानवी ३० वर्षांचा कालावधी हा शनी ग्रहावरील एका वर्षाइतका असतो. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याप्रमाणेच ‘पितर’ आणि मानवीकाळ यांचा संबंध असतो. मेलेल्या माणसांना ‘पितर’ म्हणतात. मानवाचा एका वर्षाचा कालावधी हा पितरांचा एक दिवस होतो. काळ आणि अंतरिक्ष यांचा एकमेकांशी संबंध असतो. याला काळ आणि अंतरिक्ष यांचा आलेख म्हणतात. यातले तिसरे तत्त्व मन असते. मन विरहित चेतनेच्या अवस्थेला ‘महाकाल’ म्हणतात. शिव-तत्त्व हेच असते. चेतनेची ही चौथी अवस्था असते. महाकाल म्हणजे खूप मोठा काळ. यात मनाचे अस्तित्वच शिल्लक राहत नाही. मन-विरहित काळ हा खूप मोठा काळ समजला जातो. सूर्योदयापूर्वीचा पहाटेचा ४.३० ते ६.३० हा काळ अतिशय क्रियाशील काळ समजला जातो. याला ‘ब्रह्म मुहूर्त’ म्हणतात. यानंतरच्या येणाऱ्या प्रत्येक दोन तासांच्या कालखंडाला ‘लग्न’ म्हणतात. या ‘लग्नाचा’ संबंध मानसिक अवस्थेशी असतो. आणि ही मानसिक अवस्था चंद्र- सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असते. साधारण अडीच दिवसांनी मानसिक स्थिती बदलत असते. या अडीच दिवसात अस्वस्थतेची तीव्रता कधी वाढते, तर कधी कमी होत असते. मात्र, अडीच दिवसांनंतर त्या भावनेची तीव्रता पहिल्यासारखी राहत नाही, तिच्यात निचित बदल होतो. मन, मनाच्या लहरी आणि वेळकाळ यांचा संबंध असतो, हे अतिशय मोठे आणि गहन असे एक शास्त्र आहे. ज्योतिषशास्त्रात याचा खोलवर अभ्यास केलेला असतो. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मानसिक लहरी, विचार, मते, कल्पना अशा सर्व गोष्टींचे मिळून मन तयार झालेले असते. मनाचे अस्तित्वच न जाणवणे म्हणजे ध्यानधारणा. ध्यानधारणेसाठी सकाळ किंवा संध्याकाळची वेळ जास्त चांगली समजली जाते. ध्यान करताना तुम्ही मनाच्या प्रभावातून बाहेर पडता आणि सत्त्वात विलीन होता. म्हणून वाईट कालखंडात ध्यानधारणा जरूर करावी. सत्त्वाला ‘शिव तत्त्व’ म्हणतात. शिवतत्त्व म्हणजे दयाळू वृत्ती, प्रेमळ वृत्ती, इतरांबद्दलची कळकळ आणि प्रगती साधण्याची प्रवृत्ती. अशा वृत्तींचे चित्तात खोलवर अस्तित्व असते. या वृत्ती उभारून आल्यामुळे मनातल्या आणि त्या वेळेच्या अनुषंगाने आलेल्या सगळ्या नकारात्मक भावना नष्ट होतात. ‘शिव तत्त्व’ ही चेतनेची चौथी स्थिती आहे. अस्तित्वाच्या सगळ्यात तरल अवस्थेला शिवतत्त्व म्हणतात. मन सृष्टीच्या मूलभूत अवस्थेकडे, म्हणजे सत्त्वाकडे वाटचाल करायला लागते त्यावेळेस मानसिक उन्नतीची अनुभूती मिळायला लागते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com