अर्थ बुद्धिमत्तेचा... 

ravishankar
ravishankar

बुद्धिमत्ता ही विभागणी आणि एकत्रीकरण करते. जगात काही प्राणी एकत्रीकरण, तर काही विभाजन करतात. मात्र, मानवाजवळ दोन्हीही क्षमता आहेत. मुंग्या एकत्रीकरण करतात. त्या वारूळ बांधतात आणि वस्तू एकत्र करतात. बीव्हर हा प्राणी लाकडे एकत्र करून बंधारा बांधतो. पक्षीसुद्धा एकत्रीकरण करतात. माकडे एकत्रीकरण करू शकत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट विभागतात. त्यांना फुलांचा हार द्या, ते त्याचे बारीक तुकडे करतील आणि इतस्ततः फेकून देतील. माकड फक्त विभागणी आणि विश्लेषण करू शकते. मानव विभागणी आणि एकत्रीकरण, दोन्ही करतो. भौतिक जगाचे सत्य शोधण्यासाठी बुद्धिमत्ता विश्लेषण करते. सत्य सापडल्यावर सर्वकाही एकत्रित करते. बुद्धी शांत होते, तेव्हा ज्ञानाचा जन्म होतो. सहसा लोकांचा असा समज असतो, की माहिती जमा करून माणूस बुद्धिवंत बनतो, पण तसे नसते. ‘समाधी’ बुद्धी जागवते. निर्बुद्ध माणूस सर्व माहिती मिळूनही सृजनशील होऊ शकत नाही. बुद्धिमान मात्र पुरेशा माहितीशिवायही सृजनशील असू शकतो. 

बुद्धिमत्तेची खूण म्हणजे अनेकांत एक आणि एकात अनेक पाहणे. माझ्यामध्ये तुम्ही ईश्वराला पाहत नसाल, तर आपले डोळे उघडा! तुम्ही माझ्यामध्ये ईश्वराला पाहत असाल, तर तुम्ही माझेच अंश आहात आणि तुम्ही माझ्यापासून दूर राहूच शकत नाही. तुम्ही माझेच अंश आहात, असा अनुभव तुम्ही घेत असाल, तर तुम्ही आपल्या स्वतःमध्येही ईश्वराला पाहाल. तुम्ही स्वतःमध्ये ईश्वराला पाहाल, तेव्हा त्याला सर्वांमध्ये पाहू शकाल. 

- स्वतःत परमेश्वर पाहणे म्हणजे ध्यान. 
- तुमच्या शेजारच्या माणसात परमेश्वर पाहणे म्हणजे प्रेम. 
- सर्वत्र परमेश्वर पाहणे म्हणजे ज्ञान. 
- प्रेमाची अभिव्यक्ती म्हणजे सेवा. 
- आनंदाची अभिव्यक्ती म्हणजे हास्य. 
- शांतीची अभिव्यक्ती म्हणजे ध्यान. 
- ईश्वराला अभिव्यक्त करणे म्हणजे विवेकपूर्ण कृती... 

तुम्ही फक्त खाली पडणारे पाणी पाहता. समुद्राचा ढग कसा बनतो हे तुम्ही बघत नाही, ते एक रहस्य असते. पण ढगाचा सागर बनणे प्रत्यक्ष असते, सुस्पष्ट असते. 

पुणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com