चेतना तरंग  : ध्यानासाठी कोणत्या योगासनात बसावे? 

ravishankar
ravishankar

तुम्ही आरामात आहात आणि स्थिर राहू शकता, अशा कोणत्याही आसनात तुम्ही ‌ध्यान करू शकता. पतंजली योगसूत्र, योगासनावरील प्राचिन ग्रंथांमध्ये ‘स्थिरम् सुखम् आसनम्’ असे योगासनाचे वर्णन केले आहे, म्हणजेच स्थिर आणि आरामदायक वाटेल तेच आसन. 

तुम्हाला एका जागी बसायला खूप अस्वस्थ वाटते का? खालीलपैकी एक किंवा अधिक गोष्टी एकत्र करून बघा. 
- रोज ७ मिनिटे सूक्ष्म योग करा. हे तुम्ही खुर्चीवर बसूनही करू शकता. 
- तुमच्याकडे वेळ आणि जागा असल्यास योगामॅट पसरून पद्मसाधना करू शकता. 
- त्यानंतर नाडीशोधन प्राणायाम (आलटून पालटून ‌प्रत्येक नाकपुडीने श्वास घेणे.) 

उत्साहवर्धक ध्यानाचा अनुभवासाठी.... 

आरामात बसा मात्र शिथिल नको. 
एकदा एक आगाऊ विद्यार्थी म्हणाला, की त्यांच्यासाठी सर्वांत स्थिर आणि आरामदायक आसन म्हणजे वेफर्सचा पुडा घेऊन टीव्हीसमोरच्या कोचावर आडवे पडून राहाणे. अशा प्रकारे ध्यान होणार नाही. शवासनातसुद्धा योगनिद्रा होते, ध्यान नाही. बरेच लोक ध्यानाला बसण्यासाठी योगासनांची निवड करतात, जसे की पद्मासन, वज्रासन आणि सुखासन. या आसनांमुळे पोटावरील दाब कमी होतो आणि पाठ सरळ राहते. या आसनांचे वर्णन पुढे दिलेले आहे. शरीर, खांदे व मान सैल सोडा आणि पाठ व डोके सरळ ठेवा. 

ध्यानासाठी योगासन निवडा. 
सुखासन - 
मांडी घालून बसा. 
हाताचे कोपरे शरीराच्या जवळ आणा. हात गुडघ्यावर, तळवे आकाशाकडे उघडलेले असावेत. 
पाठीचा कणा ताठ, डोके सरळ. ‘सुख’ म्हणजेच आनंद. चेहऱ्यावर हास्य ठेवायला विसरू नका. 
मांडी घालता येत नसेल तर खुर्चीवर बसून ध्यान करा. तुम्हाला हवे तर भिंतीला टेकून बसू शकता. 

पद्मासन - 
हे अतिशय लोकप्रिय आणि सर्वांना माहीत असलेले आसन आहे. 
या आसनात पाठीचा कणा ताठ राहत असल्यामुळे हे तुमचे सर्वांत आवडते आसन बनू शकते. 
आधी जमिनीवर बसून तुमचे दोन्ही पाय सरळ पसरा. 
उजवा पाय गुडघ्यात वाकवून उजवे पाऊल डाव्या मांडीवर ठेवा. 
आता डावा पाय गुडघ्यात वाकवून डावे पाऊल उजव्या मांडीवर ठेवा. 
टाचा आकाशाकडे. हाताचे तळवे गुडघ्यावर, आकाशाकडे उघडलेले. पाठीचा कणा ताठ आणि डोके सरळ. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वज्रासन 
गुडघे एकमेकांना चिकटतील अशा प्रकारे गुडघ्यावर बसा. 
तुमच्या पावलांमुळे रिकाम्या झालेल्या जागेमध्ये बसा. टाचांवर नाही. 
पाठीचा कणा ताठ आणि डोके सरळ असावे. 
सूचना : टॉवेलची गुंडाळी किंवा पातळ उशी पायाखाली ठेवल्यास घोट्यांना आधार मिळेल. 
वज्रासनामुळे मांड्या आणि पिंढऱ्यांच्या स्नायूंना बळकटी मिळते. पचनशक्ती सुधारते. 

(श्री श्री रविशंकर यांच्या ‘ध्यानाची रहस्ये’ या व्याख्यानांवर आधारित) 
अधिक वाचा https://www.artofliving.org 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com