नांदेडला ११ जणांनी केली कोरोनावर मात...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत भर पडली असली तरी आणि कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. उपचार सुरू असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ११ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने शुक्रवारी (ता. २२) त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

नांदेड - मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत भर पडली असली तरी आणि कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. उपचार सुरू असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ११ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने शुक्रवारी (ता. २२) त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने शुक्रवारी यात्री निवास एनआरआय कोविड केअर सेंटर येथील दहा रुग्ण व विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील येथील एक रुग्ण, असे एकूण ११ रुग्ण औषधोपचारामुळे बरे झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

हेही वाचा - Video - निराधारांना जगण्यासाठी हवाय मदतीचा आधार...

५६ रुग्णांवर औषधोपचार सुरू
आतापर्यंत ११६ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून उर्वरित ५६ रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. त्याचबरोबर सहा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून अजूनही दोन पॉझिटिव्ह रुग्ण फरारच आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

स्वॅब तपासणीचा अहवालाकडे लक्ष
नांदेड जिल्ह्यात ता. २२ मेपर्यंत एकूण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे एक लाख २९ हजार ४७४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. तर दोन हजार ९६१ संशयित व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी दोन हजार ५४१ स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गुरुवारी (ता. २२) पाठविण्यात आलेल्या १३४ रुग्णांचे अहवाल शनिवारपर्यंत (ता. २३) प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर ४३ रुग्णांचे स्वॅब तपासणी चालू आहे. घेतलेल्या एकूण स्वॅबपैकी ११६ रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

हेही वाचलेच पाहिजे - ....अखेर शिधापत्रिका नसलेल्यांनाही मिळाला आधार

५२ रुग्ण झाले आत्तापर्यंत बरे 
गुरुवारी (ता.२१) रात्री प्राप्त झालेल्या एकूण ८७ अहवालांपैकी सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये चार पुरुष ज्यांचे अनुक्रमे वय वर्षे १४ ते ७४ वर्षे आहे. तर दोन स्त्री रुग्णांचे वय ३४ आणि ६५ आहे. यामधील एका ७४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांपैकी दोन रुग्ण मुखेड तालुक्यातील, एक बिलोली तालुक्यातील, तर एक रुग्ण प्रवासी एनआरआय भवन येथे व उर्वरित दोन रुग्ण हे नांदेड शहरातील लोहारगल्ली भागातील आहेत. आतापर्यंत सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर ५२ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 defeated Nanded by Corona ..., Nanded news