नांदेडला पुन्हा ११६ पॉझिटिव्ह रुग्णांची भर 

अभय कुळकजाईकर | Friday, 14 August 2020

शुक्रवारी सायंकाळी ८३० अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी सातशे अहवाल निगेटिव्ह तर ११६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या तीन हजार ८१५ झाली आहे. सध्या १३२ रुग्णांची प्रकृती गंभीर असून एकूण रुग्णसंख्या तीन हजार ८१५ झाली आहे. आत्तापर्यंत दोन हजार २२५ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

नांदेड - पुन्हा शुक्रवारी (ता. १४) ११६ पॉझिटिव्ह रुग्णांची जिल्ह्यात भर पडली आहे. त्याचबरोबर दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला असून १३२ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, १०८ कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात कोरोना बाधितांची संख्या कमी झाली होती पण पुन्हा शंभराहून अधिक रुग्ण शुक्रवारी आढळून आले आहेत.
 
शुक्रवारी सायंकाळी ८३० अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी सातशे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ११६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या तीन हजार ८१५ झाली आहे. शुक्रवारच्या तपासणीत आरटीपीसीआरद्वारे पन्नास तर ॲन्टीजेन रॅपीड टेस्टद्वारे ६६ असे एकूण ११६ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

हे ही वाचा - खासदार चिखलीकर यांची केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या समितीवर

१३२ जणांची प्रकृती गंभीर
दरम्यान, उपचार सुरु असताना सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यात किनवटमधील शनीवर पेठेतील ५० वर्षीय पुरुष, मुखेड शहरातील शिवाजीनगरमधील ६० वर्षीय पुरुष, नायगाव वंजारवाडीतील ६० वर्षीय पुरुष, लोहा येथील ५५ वर्षीय महिला, मुखेड तालुक्यातील जांब येथील ६५ वर्षीय पुरुष आणि नांदेड शहरातील नंदीग्राम सोसायटीतील ५३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. सध्या १३२ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली. 

दोन हजार २२५ झाले कोरोनामुक्त
रुग्णालयातील १०८ कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून आत्तापर्यंत दोन हजार २२५ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आज शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेले रुग्ण नांदेड महापालिका, नांदेड ग्रामिण, लोहा, नायगाव, बिलोली, कंधार, मुदखेड, मुखेड, हदगाव, देगलूर, किनवट, अर्धापूर, लोहा, धर्माबाद, भोकर तालुक्यातील आहेत. त्याचबरोबर हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि निजामाबाद येथील रुग्णांचा समावेश आहे. 

हे ही वाचलेच पाहिजे - ई ‘सकाळ’चा दणका, रुग्णांना निकृष्ठ जेवण देणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई

नांदेड कोरोना मीटर 

 • एकूण सर्वेक्षण - एक लाख ५० हजार १८४ 
 • एकूण घेतलेले स्वॅब - २७ हजार ६२७ 
 • एकूण निगेटिव्ह स्वॅब - २१ हजार ४७५ 
 • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - तीन हजार ८१५ 
 • शुक्रवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ११६ 
 • एकूण मृत्यू - १४० 
 • शुक्रवारी मृत्यू - सहा 
 • एकूण रुग्णालयातून सुटी दिलेले रुग्ण - दोन हजार २२५ 
 • शुक्रवारी सुटी दिलेले रुग्ण - १०८ 
 • सध्या रुग्णालयात उपचार सुरू असलेले रुग्ण - एक हजार ४३२ 
 • शुक्रवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - ८२६ 
 • शुक्रवारी गंभीर प्रकृती असलेले रुग्ण - १३२