14 कोटी हॅकिंग प्रकरण; उत्तरप्रदेशचा एकजण नांदेड पोलिसांच्या कोठडीत

file photo
file photo

नांदेड : नवा मोंढा परिसरातील शंकर नागरी सहकारी बँकेचे खाते वजिराबाद परिसरात असलेल्या आयडीबीआय बँकेत आहे. त्यांच्या खात्यातून 14 कोटी रुपयाची रक्कम हॅकिंग करण्यात आली होती. या प्रकरणात नांदेड पोलिसांनी उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथून एकाला अटक केली. त्याला गुरुवारी (ता. चार) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयाने ता. १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

आयडीबीआय बँकेत शंकर नागरी सहकारी बँकेचे खाते आहे. शंकर नागरी बँकेचे खाते हॅक करुन त्यातील 14 कोटी 46 लाख पाच हजार 347 रुपये दोनशेहून अधिक खात्यांमध्ये वळती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकारे वजिराबाद पोलिसांनी बँकेचे सरव्यवस्थापक श्री. राजे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात हॅकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात सायबर सेलच्या माध्यमातून पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकानी आतापर्यंत सोळा आरोपी अटक केले. यातील काही कर्नाटक राज्यातील धारवाड, मुंबई येथील लोखंडवाला काॅम्पलेक्स येथून अटक केली होती. हे सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. यात काही विदेशी महिला व पुरषांचाही समावेश आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून आरोपींना अटक केली. आरोपींची संख्या वाढत गेल्यानंतर विमानतळ पोलिसांनी मुंबई येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधून अभिजीत अदानी शेट्टी याला अटक केले. त्याच्याकडून कर्नाटक बँकेचे धनादेश, रिझर्व बँक ऑफ इंडियाचे बनावट क्रेडिट कार्ड व इतर साहित्य जप्त केले.

सर्व आरोपी वजिराबाद पोलिसांच्या कोठडीत असताना उत्तर प्रदेशातून मयंक शर्मा नावाच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. त्याने विविध खात्यावर सोळा लाख रुपये वळती केल्याचे सांगण्यात येते. नांदेडमध्ये आल्यानंतर त्याला गुरुवारी (ता. चार) न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने ता. 16 फेब्रुवारीपर्यंत त्याला पोलिस कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून आरोपींची संख्या आता 16 वर पोहोचली असल्याचे भंडरवार यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com