esakal | जिल्ह्यातील १४ शासकीय कोविड केअर सेंटर बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

शुक्रवारी (ता. ३०) एक हजार २९९ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार २२६ अहवाल निगेटिव्ह तर ४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात तिघांचा मृत्यू आणि १०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जिल्ह्यातील १४ शासकीय कोविड केअर सेंटर बंद 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या शून्यावर आली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरपैकी १४ कोविड सेंटर बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. 

गुरुवारी (ता. २९) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी शुक्रवारी (ता. ३०) एक हजार २९९ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार २२६ अहवाल निगेटिव्ह तर ४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात तिघांचा मृत्यू आणि १०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

हेही वाचा- नांदेडच्या प्रा. यशपाल भिंगेंना विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून ऑफर ​

जिल्ह्यातील मृत्यांची संख्या ५०७ 

शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये ४३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९ हजार ७० इतकी झाली आहे. बाफना रोड नांदेड येथील खासगी रुग्णालयातील पुरुष (वय ६१), जिल्हा रुग्णालयातील वजिराबाद येथील पुरुष (वय ५९) आणि विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या बिलोली तालुक्यातील पुरुष (वय ३८) या तीन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यांची संख्या ५०७ वर जाऊन पोहचली आहे. 

हेही वाचले पाहिजे- शंकरनगर येथील ‘त्या’ अत्याचार पिडीत मुलीस मिळाला हक्काचा निवारा

७० रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार 

उपचारानंतर श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयातील सहा, यात्री निवास, महसूल भवन आणि होम आयसोलेशन मधील ६०, लोहा कोविड सेंटर तीन, बिलोली दोन, कंधार सहा, हदगाव एक, किनवट दोन व खासगी कोविड सेंटरमधील २५ असे १०५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली. आतापर्यंत १७ हजार ८२२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. 

१७ हजार ८२२ रुग्ण कोरोनामुक्त

आटीपीसीआर व ॲन्टीजन टेस्ट किटद्वारे शुक्रवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - २०, नांदेड ग्रामीण - दोन, बिलोली - सहा, कंधार-तीन, अर्धापूर - एक, धर्माबाद - एक, किनवट - तीन, नायगाव - एक, भोकर - एक, देगलूर - दोन, हिमायतनगर - एक, मुदखेड - एक आणि उमरी - एक असे ४३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या १९ हजार ७० इतकी झाली असून, त्यापैकी १७ हजार ८२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या सहाशे कोरोना बाधितावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी केवळ ७० रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर उर्वरित रुग्ण जिल्ह्यातील विविध शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. त्यापैकी ४० बाधितांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ३९१ संशयित स्वॅब तपासणी सुरु होती. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह - १९ हजार ७० 
आज पॉझिटिव्ह - ४३ 
एकुण कोरोनामुक्त - १७ हजार ८२२ 
आज कोरोनामुक्त - १०५ 
एकुण मृत्यू - ५०७ 
आज मृत्यू - तीन 
उपचार सुरु - ६०० 
गंभीर रुग्ण - ४१ 
स्वॅब अहवाल प्रलंबित - ३९१ 

loading image