
नांदेड : सोमवारी १९ जणांना कोरोनाची लागण
नांदेड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती सामान्य होताना दिसत आहे. सोमवारी (ता.१४) प्राप्त झालेल्या ८१८ अहवालापैकी केवळ १९ जणांचे अहवाल कोरोनाबाधीत आले आहेत. दिवसभरात ३३ रुग्ण कोरोना आजारातुन बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. कोरोना आजारातुन मुक्त होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख दोन हजार ५५९ इतकी झाली असून, ९९ हजार ७२४ रुग्ण आजारातुन मुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत दोन हजार ६८८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सोमवारी दिवसभरात नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात १२, माहूर एक, अर्धापूर एक, मुदखेड एक, बिलोली एक हदगाव एक, हिंगोली एक व बीड एक असे १९ अहवाल बाधीत आले आहेत.विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात पाच, नांदेड महापालिकेंतर्गत गृहविलगीकरणातील २५ व खासगी रुग्णालयातील तीन असे ३३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. सध्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात १४, नांदेड महापालिका गृहविलगीकरणात ५०, नांदेड तालुक्यांतर्गत गृहविलगीकरणात ७३ व खासगी रुग्णालयात १० असे १४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी पाच रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
नांदेड कोरोना मीटर
एकूण बाधित ः एक लाख दोन हजार ५५९
एकूण बरे ः ९९ हजार ७२४
एकूण मृत्यू ः दोन हजार ६८८
सोमवारी बाधित ः १९ सोमवारी
मृत्यू ः शुन्य
सोमवारी बरे ः ३३
उपचार सुरु ः १४७
गंभीर रुग्ण ः पाच
Web Title: 19 People Infected With Corona Nanded Corona Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..