लिंबोटी धरणाच्या लाभक्षेत्रातील 23 गावांना पाणी मिळणार- श्यामसुंदर शिंदे

लिंबोटी धरणातून याअगोदर रब्बी हंगामासाठी तीन पाणी पाळी सोडण्यात आल्या होत्या. व सध्या उन्हाळ्यात दोन पाणी पाळी लाभ क्षेत्रात सोडण्यात आल्या आहेत.
आमदार श्यामसुंदर शिंदे
आमदार श्यामसुंदर शिंदे

लोहा (जिल्हा नांदेड) : लोहा, कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे (Mla shyamsunder shinde) यांनी मतदारसंघातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पाटबंधारे दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे लिंबोटी धरणातील (Limboti dam) आरक्षित पाण्यातील पाणी पाळी सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. आमदार शिंदे यांच्या प्रयत्नाला यश आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी लिंबोटी धरणातून दोन दलघमी पाणी लाभ क्षेत्रात सोडण्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता (execative engginear) यांना पत्रकान्वये कळविले आहे. 23 villages in the benefit area of Limboti dam will get water shift- Shyamsunder Shinde

लिंबोटी धरणातून याअगोदर रब्बी हंगामासाठी तीन पाणी पाळी सोडण्यात आल्या होत्या. व सध्या उन्हाळ्यात दोन पाणी पाळी लाभ क्षेत्रात सोडण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता आमदार शिंदे यांनी सहावी पाणी पाळी सोडण्याच्या मागणीला यश आले. या पाणी पाळीमुळे लोहा तालुक्यातील निळा, शेलगाव, पिंपळगाव, रायवाडी, मलकापूर, हाडोळी, दगड सांगवी, पोखर भोशी, मजरे सांगवी, डोंगरगाव, लिंबोटी, आंबे सांगवी व पोखरी अशा 14 गावांना लाभ होणार आहे.

हेही वाचा - लॉकडाउनमुळे बरीच ऑनलाइन केंद्रे बंद आहेत त्यामुळे ऑनलाइन नोंदणी करताना सध्या तर ग्रामीण भागातील अशिक्षित कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणे मुश्‍कील बनले आहे.

तसेच कंधार तालुक्यातील नवघरवाडी, घोडज, जांभुळवाडी, आनंदवाडी, उमरज, बोरी, बाळंतवाडी, गंगनबीड, बाभूळगाव अशा नऊ गावांना या पाणी पाळीचा लाभ होणार आहे. लिंबोटी धरणातून हे पाणी कालवे व नाल्याद्वारे शनिवारी (ता. आठ) सोडण्यात येणार असून या पाणी पाळ्यामुळे लोहा व कंधार तालुक्यातील गुरेढोरे व नागरिकांना या पाण्याचा तीव्र उन्हाळ्यात मोठा लाभ होणार आहे. लिंबोटी धरणातील लाभक्षेत्रातील 23 गावांतील पाणीटंचाई या पाणी पाळीमुळे काही अंशी दूर होणार असल्याने मतदारसंघातील या 23 गावकऱ्यातून आमदार शिंदे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com