जिल्हा बॅंकेची २३० कर्मचाऱ्यांवर मदार

६३ शाखांना हवे ६०७ कर्मचारी; विलंबामुळे शेतकऱ्यांनी केला विरोध
nanded
nandedSakal

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. ६३ शाखांमध्ये ६०७ कर्मचाऱ्यांशी आवश्यकता असताना बॅंकेचा कारभार केवळ २३० कर्मचाऱ्यांवर चालविण्यात येत आहे. यामुळे शासनाकडून मदत वाटपाच्या कामांना विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी यावेळी जिल्हा बॅंकेकडून वाटप नको, अशी भूमिका घेतली आहे.

एकेकाळी ग्रामीण भागाची कामधेनू असलेली नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक तत्कालीन संचालक मंडळाच्या धोरणामुळे डबघाईस आली होती. यानंतर आरबीआयने प्रशासकाची नियुक्ती करुन कारभार सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मागील काही वर्षापासून पुन्हा संचालक मंडळाने बॅंकेचा कारभार ताब्यात घेतला. परंतु इतर बॅंकेच्या स्पर्धेत जिल्हा बॅंकेचा कारभार कोसो दूर असल्याचे मागील काही दिवसाच्या कामावरुन स्पष्ट होत आहे. जिल्हा बॅंकेकडे शासनाकडून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत मिळणारी मदत वाटपाचे काम देण्यात येत आहे. परंतु बॅंकेकडे मनुष्यबळाची वाणवा आहे.

nanded
शेतकऱ्यांना पुर्वीप्रमाणेच जमिनीचा मोबदला मिळेल : मंत्री तनपुरे

जिल्ह्यात ६३ शाखा असलेल्या जिल्हा बॅंकेला ६०७ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना कारभार केवळ २३० कर्मचाऱ्यावर अवलंबून आहे. यामुळे जिल्ह्यातील साडेपाच ते आठ लाख खातेदारांची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना दहा महिन्याची प्रतिक्षा करावी लागत आहे.

यामुळे आगामी काळात शासनाचे अनुदान पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर थेट खात्यावर टाकावे, अशी मागणी करत जिल्हा बॅंकेकडून नको रे बाबा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

nanded
त्वरीत विक्री अन् रोख पैसा यामुळे शेतकऱ्यांची तुरीला पसंती

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळण्यास खूप विलंब लागत आहे. यामुळे नुकसानग्रस्तांना हक्काच्या पैशासाठी ताटकळत बसावे लागते. यामुळे जिल्हा बॅंकेऐवजी शेतकऱ्यांना इतर पर्यांयाचा अवलंब करुन त्वरीत मदत द्यावी.

- संतोष गव्हाणे, प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड प्रणित शेतकरी आघाडी.

१६ एटीएम मशीन बसविणार

बॅंकेच्या कामात सध्या सुत्रूतता आली आहे. जिल्हा बॅंकेकडून तालुकास्तरावर प्रत्येकी एक या प्रमाणे १६ एटीएम मशीन बसविण्याचे काम सुरु आहे. आजपर्यंत एक लाख खातेदारांना एटीएम कार्डचे वाटप करण्यात आले. एक लाख कार्ड वाटपाचे काम सुरु आहे. मशीन कार्यान्वीत होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागेल. यामुळे यंदा मदत वाटपाला विलंब लागणार नाही, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक अजय कदम यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com