नांदेड विभागात २४ साखर कारखाने सुरु; ५१ लाख टन ऊस गाळप तर ४९ लाख क्विंटल साखरचे उत्पादन

कृष्णा जोमेगावकर, अभय कुळकजाईकर
Saturday, 6 February 2021

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागात नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्याचा समावेश आहे. या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२० - २०२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात १७ खासगी तर नऊ सहकारी साखर करण्यांचा समावेश होता. 

नांदेड - नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यातील २४ साखर कारखान्यांमध्ये रविवारअखेर (ता. ३१ जानेवारी) ५१ लाख ५४ हजार टन उसाचे गाळप झाले तर ४९ लाख १२ हजार क्विंटल साखरचे उत्पादन झाले आहे. 

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागात नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्याचा समावेश आहे. या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२० - २०२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात १७ खासगी तर नऊ सहकारी साखर करण्यांचा समावेश होता. 

हेही वाचा - नांदेड : मालेगावात होणार ग्रामीण रुग्णालय; परिसरातील नागरिकांना मिळणार आरोग्य सुविधा

५१ लाख ५४ हजार ५० टन उसाचे गाळप                                                नांदेड विभागात आजपर्यंत २४ कारखान्यांनीच गाळप सुरु केले आहे. यात दहा सहकारी तर १४ खासगी कारखान्याचा समावेश आहे. या २४ कारखान्यांनी रविवारअखेर (ता. ३१) ५१ लाख ५४ हजार ५० टन उसाचे गाळप केले आहे. तर यापासून ४९ लाख १२ हजार ६४५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.५३ असल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयातून देण्यात आली.

हेही वाचलेच पाहिजे - गोदावरी नदी संसद तर्फे नदी जलशुद्धीकरण कारसेवा
 
हे कारखाने सुरू                                                                               गाळप सुरु केलेल्या कारखान्यात नांदेड जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण, एमव्हीके वाघलवाडा, शिवाजी शुगर बाऱ्हाळी, हडसणी येथील सुभाष शुगर लिमिटेड, कुंटूरकर शुगर्स लिमिटेड, कुंटूर व व्यंकटेश्वरा शुगर लिमीटेड शिवणी या कारखान्यांचा समावेश आहे. तर हिंगोलीमधील भाऊराव चव्हाण, डोंगरकडा, पूर्णा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वसमत, कपिश्वर शुगर लिमीटेड, बाराशिव, टोकार्इ कारखाना कुरुंदा, शिऊर साखर कारखाना लिमिटेड वाकोडी हे कारखाने सुरू आहेत.

नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

हे कारखाने सुरू                                                                             परभणी जिल्ह्यातील बळीराजा साखर कारखाना कानखेड, गंगाखेड शुगर, टेवन्टीवन शुगर सायखेडा, योगेश्वारी शुगर लिमिटेड, लिंबा, रेणुका शुगर लिमिटेड, पाथरी, त्रिधारा शुगर लिमीटेड, अमडापूर हे कारखाने तर लातूर जिल्ह्यात विकास सहकारी साखर कारखाना लिमिटेड लातूर, मांजरा सहकारी साखर कारखाना विलासनगर, विलास सहकारी तोंडार, रेणा, जागृती, साइबाबा, टेवन्टीवन हे कारखाने सुरु झाले आहेत.

कारखानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन
(गाळप टनात तर साखर उत्पादन क्विंटलमध्ये)
जिल्हा...कारखाने...ऊस गाळप...साखर उत्पादन
नांदेड...सहा...१०,७३,५९५...१०,२७,९४०
लातूर...सात...१७,४०,१२०...१६,००,७३०
परभणी...सहा...१४,७२,९०२...१४,०८,८४५
हिंगोली...पाच...८,६७,४३३...८,७५,१३०
एकूण...२४...५१,५४,०५०...४९,१२,६४५

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 24 sugar factories started in Nanded division; Production of 51 lakh tonnes of sugarcane and 49 lakh quintals of sugar nanded suger news