सोमवारी २५ रुग्ण कोरोनामुक्त; दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह 

file Photo
file Photo

नांदेड - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ वरुन ९५.१० टक्के इतके झाले आहे. मागील तीन दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी गंभीर असलेल्या एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे सोमवारी देखील जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ५८२ वर स्थिर आहे. 

रविवारी (ता.२४) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी सोमवारी (ता.२५) एक हजार ५७३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी एक हजार ५४५ अहवाल निगेटिव्ह, दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या २२ हजार २७४ इतकी झाली आहे. 

३०५ बाधितांवर उपचार सुरु 

सोमवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील - दोन, मनपा अंतर्गत गृह विलगीकरण कक्षातील - पाच, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय - नऊ, माहूर - दोन, मुदखेड- चार व खासगी रुग्णालय - तीन असे २५ बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. जिल्हाभरातील आतापर्यंत २१ हजार १८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रातील सात, नांदेड ग्रामीण - एक, किनवट- दोन, कंधार - दोन, हदगाव- दोन, मुखेड- एक, अर्धापूर - एक व मुंबई एक असे दहा कोरोनाबाधीत रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. सध्या ३०५ बाधितांवर उपचार सुरु असून, त्यापैकी नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 

३९६ स्वॅबची तपासणी सुरु 

विष्णुपुरी शासकीय रुग्णालय - १६, जिल्हा शासकीय रुग्णालय - १७, जिल्हा शासकीय रुग्णालय नवीन इमारत - नऊ, महसूल भवन कोविड केअर सेंटर - नऊ, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण - १९३, मुखेड - सात, किनवट - दोन, देगलूर - चार, तालुकांतर्गत गृहविलगीकरण कक्षात - ३५ व खासगी रुग्णालयात - १३ असे जिल्हाभरातील शासकीय, खासगी व घरी राहून उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३०५ इतकी आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत ३९६ स्वॅबची तपासणी सुरु होती. 

नांदेड कोरोना मीटर ः 

एकूण पॉझिटिव्ह - २२ हजार २७४ 
एकूण कोरोनामुक्त- २१ हजार १८४ 
एकूण मृत्यू- ५८२ 
रविवारी पॉझिटिव्ह - दहा 
रविवारी कोरोनामुक्त - २५ 
रविवारी मृत्यू - शुन्य 
उपचार सुरु -३०५ 
गंभीर रुग्ण - नऊ 
स्वॅब तपासणी सुरु - ३९६ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com