esakal |  नांदेडला २५ अहवाल पॉझिटिव्ह, दिवसभरात ३२ रुग्ण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

रविवारी ८४४ अहवाल प्राप्त झाले. यातील ८१८ निगेटिव्ह तर २५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

 नांदेडला २५ अहवाल पॉझिटिव्ह, दिवसभरात ३२ रुग्ण कोरोनामुक्त

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - लवकरच कोरोना प्रतिबंधक लसी करण होणार आहे. त्यापूर्वी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. रविवारी (ता. दहा) प्राप्त झालेल्या अहवालानुसार ३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर नव्याने २५ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, घरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४. ७९ टक्के असे आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. 

शनिवारी तपासणीसाठी घेण्यात आलेल्या अहवालापैकी रविवारी ८४४ अहवाल प्राप्त झाले. यातील ८१८ निगेटिव्ह तर २५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ हजार ८४१ इतकी झाली आहे. उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी रविवारी दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा ५७८ वर स्थिर आहे. 
रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील - तीन, नांदेड महापालिकेंतर्गत एनआरआय भवन, गृहविलगीकरण कक्षातील - १५, जिल्हा शासकीय रुग्णालय- सहा, देगलूर - एक, माहूर - एक, खासगी रुग्णालय - पाच आणि हैदराबाद येथे संदर्भित एक असे ३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

हेही वाचा- नांदेड : बदलती आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारांनी सज्ज व्हावे : खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे

३५७ बाधित रुग्णांवर उपचार सुरु 

आतापर्यंत २० हजार ७०५ रुग्ण कोरोनाचा उपचार घेऊन घरी परतले आहेत. रविवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रातील - १९, कंधार - एक, नायगाव - एक, देगलूर - चार असे २५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या २१ हजार ८४१ इतकी झाली असून, सध्या ३५७ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी नऊ रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत ४०२ स्वॅब अहवालाची तपासणी सुरु होती. 

हेही वाचा- चांगली बातमी : नांदेड विभागात ३७ लाख टन उसाचे गाळप; ३७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन​

नांदेड कोरोना मीटर 

एकूण पॉझिटिव्ह - २१ हजार ८४१ 
एकूण बरे - २० हजार ७०५ 
एकूण मृत्यू - ५७८ 
रविवारी पॉझिटिव्ह - २५ 
रविवारी बरे - ३२ 
रविवारी मृत्यू - शुन्य 
गंभीर रुग्ण - नऊ 
स्वॅब तपासणी सुरु - ४०२ 
 

loading image