Corona Big Breaking : दिवसभरात २८ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू  

प्रमोद चौधरी | Sunday, 12 July 2020

नांदेड जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ६१६ इतकी झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली आहे.

नांदेड : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. रविवारी (ता.१२) दोन तासात दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या आता ३० झाली आहे. तर दिवसभरात २८ रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ६१६ इतकी झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली आहे.

परभणीच्या आनंदनगर येथील ३४ वर्षीय तरुणाला श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला नऊ जुलै रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारास प्रतिसाद दिला नसल्याने रविवारी सकाळी ११ वाजता त्याचा मृत्यू झाला. तसेच नांदेडच्या सोमेश कॉलनी भागातील ७५ वर्षीय वृद्धाला १७ जून रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर २५ दिवस त्यांची मृत्युशी झुंज सुरु होती. अखेर रविवारी सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - 

रविवारी २८ पॉझिटिव्ह
कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनासह नांदेडकरांच्या चिंतेत आता वाढ होवू लागली आहे. शनिवारी (ता.११) रात्री उशीरा १६ तर  रविवारी दिवसभरात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे २८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये सर्वाधिक ग्रामीण भागातील असून महिलांचा समावेश सर्वाधिक आहे. 

नांदेड शहर
उमर कॉलनी एक महिला (वय ५५), रहेमान नगर एक महिला (वय ६१), हमिदियानगर एक महिला (वय ४०), फरांदेनगर एक पुरुष (वय ५९) व एक महिला (वय ५०), गोकुळनगर एक बालक (वय ३) व एक पुरुष (वय ६६), गंगाचाळ एक पुरुष (वय ५८), राजनगर एक महिला (वय २०), सिडको एक मुलगा (वय ३), असर्जन एक पुरुष (वय ३८), धनेगाव नांदेड एक मुलगी (वय ९), वाजेगाव येथील एक पुरुष (वय ४१)

हे देखील वाचाच - कोरोना इफेक्ट : मामामुळे भाच्यावर गंडांतर, लग्न रद्द, व्हावे लागले क्वारंटाईन -

नांदेड ग्रामीण
मुखेड शहरातील तीन पुरुष (वय ३३,५५ व ८५) व एक महिला (वय ६५), मुक्रमाबाद दोन पुरुष (१२ व ३२), कावळगाव मुखेड दोन पुरुष (वय ११, ४०), शंकरगंज ता. धर्माबाद एक महिला (वय ५५),  गांधी चौक (ता.बिलोली) एक पुरुष (वय ३९), कुंडलवाडी एक पुरुष (वय ४६), नरसी नायगाव दोन पुरुष (वय ४५ व ४८), एक महिला (वय ६५), नागोबामंदिर परिसर देगलूर एक महिला (वय ६८) व एक पुरुष (वय ६४), देगलूर शहरातील एक पुरुष (वय ५८), तसेच विकासनगर कंधार सहा महिला (वय ६,६,३२,४३,४६,५५,६५) आणि एक पुरुष (वय १५), काटकळंबा ता. कंधार एक महिला (वय ५५), बाजार मोहल्ला ता. मुदखेड दोन महिला (वय १३ व १८)

इतर जिल्हे
कावी ता. जिंतूर येथील एक पुरुष (वय ७०), गुंज ता. वसमत येथील एक महिला (वय३३), जळकोट जि. लातूर येथील एक पुरुष (वय ६०) यांचा समावेश आहे.
 
नांदेड कोरोना मीटर

  • एकूण कोरोना बाधित रुग्ण - ६१६ 
  • आजचे पॉझिटिव्ह - २८
  • आजचे मृत्यू - २
  • उपचार सुरु - २११
  • उपचार घेऊन घरी परतलेले  - ३७५
  • एकूण मृत्यू - ३०