अर्धापूर ग्रामीण रुग्णालयासाठी 34 पदांना मंजुरी; आत्ता प्रतिक्षा नियुक्त्यांची

अर्धापूर तालुका अस्तित्वात येवून दोन दशके पुर्ण झाली आहेत. पण अद्याप तालुक्यातील दिड लाखांच्यावर नागरिकांना ग्रामीण रुग्णालयाची सुविधा मिळत नसल्यामुळे नांदेड जावे लागत होते.
अर्धापूर रुग्णालय पद मंजूर
अर्धापूर रुग्णालय पद मंजूर

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : गेल्या दोन दशकांच्या प्रतिक्षेनंतर ग्रामीण रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या रुग्णालयासाठी 34 पदांना शासनाची मंजुरी मिळाल्याने एक महत्त्वाचा टप्पा पुर्ण झाला आहे. इमारतीचे राहिलेले किरकोळ तातडीने कामे पूर्ण झाल्यास येत्या तीन ते चार महिण्यात हे रुग्णालय कार्यान्वित होऊ शकते. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून पाठपुरावा करणे आवश्यक आहे. या रुग्णांच्या बांधकामाकडे पालकमंत्री अशोक चव्हाण लक्ष ठेवून असून लवकरच अर्धापूरकरांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी प्रयत्न करित आहेत.

अर्धापूर तालुका अस्तित्वात येवून दोन दशके पुर्ण झाली आहेत. पण अद्याप तालुक्यातील दिड लाखांच्यावर नागरिकांना ग्रामीण रुग्णालयाची सुविधा मिळत नसल्यामुळे नांदेड जावे लागत होते. तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र , नागरी रुग्णालयामार्फत वैद्यकीय सुविधा मिळत होती.

हेही वाचा - भारतात हजारो वर्षापासून बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. शिक्षणात मागासलेल्या समाजातील मुलां- मुलींसाठी शाळा काढल्या.

ग्रामीण रुग्णालय व्हावे ही गेल्या दोन दशकांची मागणी पुर्ण होत असून ईमारतीचे कांम अंतिम टप्प्यात आहे. काही किरकोळ कामे बाकी आहेत. या ग्रामीण रुग्णालयासाठी पदांना मंजूरी देण्यात यावी या मागणीचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत मंत्रालयात पाठविण्यात आला होता. या प्रस्तावात काही तांत्रिक त्रुटी काढण्यात आल्या होत्या. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रालयातील संबंधित विभागाशी संपर्क करुन पदांना मान्यता मिळून घेतली आहे.

या रुग्णालयात 34 पदे राहणार असून यात कुशल, अकुशल अधिकारी व कर्मचारी राहणार आहेत. यात दहा कायम पदे तर काही पदे बाह्ययंत्रनेतून उपलब्ध करुन घेण्यात येणार आहे. या पदमान्यतेचा शासन आदेश काढण्यात आली आहे. या पदांना मान्यता मिळाल्याने रुग्णालय कार्यान्वीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com