१८ दिवस उपचार अन्... डॉक्टरांचे प्रयत्न झाले यशस्वी

शासकीय रुग्णालयाची तत्परता; ४८ वर्षीय महिलेला मिळाले जीवदान
48 year old woman Successfully treated at government hospital
48 year old woman Successfully treated at government hospitalSakal

नांदेड - आजकाल अगदी साधा आजार असला तरी अनेकजण शासकीय रुग्णालयावर फारसा विश्वास न दाखवता थेट खासगी रुग्णालयात दाखल होतात. मात्र, अनेकवेळा खासगी रुग्णालयाने नाकारलेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णालयात अगदी खात्रीशीर यशस्वी उपचार केले जातात, हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. असेच काहीचे हिमायतनगर येथील रहिवासी ४८ वर्षीय महिलेवर विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयात १८ दिवस उपचार करुन महिलेला जीवदान देण्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या टिमला यश आले आहे.

हिमायतनगर धानोरा येथील महिला १८ ते २० दिवसापूर्वी अतिशय गंभीर अवस्थेत विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाली. महिलेची प्रकृती अतीशय गंभीर होती. विष्णुपुरीच्या रुग्णालयातील अपघात विभागात गंभीर अवस्थेत महिलेला दाखल करण्यात आले. त्या वेळेस रुग्णाच्या नाडीचे ठोके व बीपी मिळत नव्हता. तीव्र स्वरुपाचा ताप होता. बेशुद्ध अवस्थेत दाखल झालेल्या या महिला रुग्णांवर सहयोगी प्राध्यापक डॉ. शीतल राठोड व त्यांच्या पथकातील डॉक्टरांच्या टीमने तातडीने प्राथमिक उपचार सुरु केले.

अपघात विभागातून पुढील उपचारासाठी रुग्णास अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांच्या तपासणी व सोनोग्राफीनंतर पेशंटच्या लिव्हरमध्ये पु तयार होऊन त्याच्या गाठी (मल्टीपल लिव्हर ॲबसेस) असल्याचे निदान झाले. तो पू रक्तामध्ये पसरल्याने डॉक्टरांनी वेळ न लावता त्या गाठीमध्ये सुई टाकून पू बाहेर काढण्यास सुरवात केली. दुसऱ्या बाजूस आवश्यक ते उपचार सुरू केले. रुग्णास व्हेंटीलेटर लावण्यात आले. तीन दिवसानंतर प्रकृतीत सुधारणा दिसून आली. अतिदक्षता विभागात आठ दिवस उपचार केल्यानंतर रुग्णास सामान्य वॉर्डात हलविण्यात आले.

डॉ. शीतल राठोड यांच्या पथकातील डॉ. संदेश मालू, डॉ. अभिषेक काबरा, डॉ. अभिनव रामावत, डॉ. ओंकार, डॉ. शुभांगी, डॉ. सायली, डॉ. अक्षय, डॉ. आदित्य, डॉ. क्षितीज, डॉ. फैजा यांच्या अथक परिश्रमांना यश आले.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या टिमचे कौतुक

वॉर्डमधील दहा दिवसाच्या देखरेखीनंतर व उपचारानंतर रुग्ण बरा झाला व रुग्णास तब्बल २० दिवसानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.aआपल्या रुग्णास जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांचे आभार व्यक्त करताना नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. यावेळी अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रदीप बोडखे, विभागप्रमुख डॉ. कपिल मोरे यांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या टिमचे कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com