नांदेड जिल्ह्यातील ५० वाळू घाटांचे होणार लिलाव

जिल्हा प्रशासनातर्फे प्रक्रिया सुरू; अवैध वाळू उपसा मात्र सुरूच
50 sand ghats to be auctioned Nanded
50 sand ghats to be auctioned Nandedsakal

नांदेड : जिल्ह्यातील ५० वाळू घाटांच्या लिलावाची आॅनलाइन प्रक्रिया जिल्हा प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी सोमवारपर्यंत (ता. १४) मुदत देण्यात आली असून मंगळवारी (ता. १५) लिलाव होणार आहे. मात्र, असे असले तरी दुसरीकडे शहरासह जिल्ह्यातही अवैध वाळू उपसा सुरूच असल्याचे चित्र आहे.

नांदेड जिल्ह्यात गोदावरी, मांजरा, पैनगंगा, लेंडी, मन्याड, आसना या प्रमुख नद्यासह इतरही नद्या, नाले, ओढे आहेत. या ठिकाणी वाळू माफिया चोरट्या आणि अवैध मार्गाने वाळू उपसा करण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. महसूल विभागाच्या वतीने तहसील कार्यालयातंर्गत वाळू माफियांवर कारवाया करण्यात येत असतात त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्यासह इतर अधिकारी देखील अधूनमधून कार्यवाही करतात. तरी देखील वाळू माफिया अजूनही बऱ्याच ठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याचे चित्र आहे.

दरम्‍यान, महसूल प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील ५० वाळू घाटांचे लिलाव होणार असून त्याची निविदा काढण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. या वाळू घाटांच्या लिलावात सहभागी होण्यासाठी शेवटची तारिख १४ फेब्रुवारी असून ता. १५ फेब्रुवारी रोजी आॅनलाइन वाळू घाटाचा लिलाव होणार आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील कारला (ता. बिलोली), सांगवी उमर (ता. देगलूर) आणि लांजी (ता. माहूर) या तीन वाळू घाटांचे लिलाव झाले होते. आता जिल्ह्यातील ५० वाळू घाटांचे लिलाव होणार आहेत.

गोदावरीवरील वाळूघाटाचे लिलाव नाही

जिल्ह्यातील मांजरा, पैनगंगा आणि लेंडी नदीवरील ५० वाळूघाटांचे लिलाव होणार आहे. गोदावरी नदीच्या पात्रातील वाळू घाटांवर सध्या पाणी असल्याने राष्ट्रीय लवादाच्या निर्णयानुसार त्या ठिकाणचे लिलाव होणार नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड, नायगाव, उमरी, धर्माबाद, लोहा या तालुक्यांमध्ये गोदावरी नदीवरील जवळपास ५६ ते ६० वाळू घाटांचा समावेश आहे.

वाळूचे भाव कमी होणार!

सध्या वाळूचे दर एका ब्रासला चार ते पाच हजार रुपये आहेत. गेल्या वर्षी शासनाचा दर प्रतिब्रास जवळपास साडेचार हजार रुपयांपर्यंत गेला होता. त्यामुळे वाळू महाग झाली होती. यंदाच्या वर्षी तो प्रतिब्रास सहाशे रुपयांपासून सुरू होणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी वाळूचे भाव कमी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com