नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पात ६६ टक्के पाणीसाठा

पाटबंधारे विभागाची माहिती : विष्णुपुरी प्रकल्पात ४५.३१ टक्के पाणी
नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पात ६६ टक्के पाणीसाठा
नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पात ६६ टक्के पाणीसाठाsakal

नांदेड : जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघू प्रकल्प, केटी वेअरसह उच्च पातळी बंधाऱ्यात सध्या ४९३.८९ दशलक्ष घनमीटरनुसार ६६.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात जिल्ह्यात ५९.६२ टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात जूनमध्ये दमदार सुरवात केलेल्या पावसाने मध्यंतरी २२ दिवसाची उघडीप दिली होती. यानंतर जुलैमध्ये मात्र पावसाने जोरदार सुरुवात करत मागची कसर भरुन काढली. दरम्यानच्या काळात काहीसा मंदावलेला पाऊस ऑगष्ट, सप्टेंबरमध्ये जोर धरला. या पावसामुळे जिल्ह्यात लहान-मोठ्या नद्यांसह नाल्यांना पुर आला होता. पावसाळ्यात संपूर्ण प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. यानंतर रब्बी तसेच उन्हाळी पाणी पाळ्यांचे नियोजन करुन पाणी सोडण्यात येत असल्याने सध्या पाणी पातळी खालावली आहे.

जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात ४५.३१ टक्के पाणी शिल्लक आहे. दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात ६८.०८ टक्के पाणीसाठा आहे. या सोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात ६१.६९ टक्के, चार कोल्हापुरी बंधार्‍यात २.७५ दशलक्ष घनमीटरनुसार ३६.९३ टक्के, ८८ लघू प्रकल्पात ५५.२० टक्के, नऊ उच्च पातळी बंधार्‍यात ८५.६० टक्के असा एकूण ४९३.८९ दशलक्ष घनमीटरनुसार ६६.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

या सोबतच नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ६९१.०१ दलघमीनुसार ८५.३३ टक्के व सिद्धेश्‍वर प्रकल्पात २९.४८ दलघमीनुसार ३६.४८ टक्के तसेच यवतमाळ जिल्ह्यातील उर्ध्व पेनगंगा (इसापूर) या प्रकल्पात ७८७.५८ दलघमीनुसार ८१.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पनिहाय पाणीसाठा

  • प्रकल्प - दलघमी - टक्केवारी

  • विष्णुपुरी - ४३.८८ - ४५.३१

  • मानार - ९४.१० - ६८.०८

  • मध्यम प्रकल्प (९) - ८५.७९ - ६१.६९

  • लघू प्रकल्प (८८) - १०४.८० - ५५.२०

  • उच्च पातळी बंधारे (९) - १६२.५० - ८५.६०

  • कोल्हापुरी बंधारे (चार) - २.७५ - ३६.९३

  • एकूण प्रकल्प १०८ - ४९३.८९ - ६६.२८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com