esakal | नागरिकांच्या सहभागातून परिपूर्ण सर्वेक्षण करावे- वर्षा ठाकूर-घुगे
sakal

बोलून बातमी शोधा

नागरिकांच्या सहभागातून परिपूर्ण सर्वेक्षण करावे- वर्षा ठाकूर-घुगे

नागरिकांच्या सहभागातून परिपूर्ण सर्वेक्षण करावे- वर्षा ठाकूर-घुगे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड: स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण २०२१ ची घोषणा करण्यात आली असून सर्व गट विकास अधिकारी यांनी नागरीकांचा सहभाग घेऊन मोबाईलच्या माध्यमातून सर्वेक्षण करुन घ्‍यावे, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी बुधवारी (ता. २२) केले आहे.

हेही वाचा: Nanded : पावणे तेरा लाख जणांनी घेतली कोरोना लस

जिल्हा परिषदेमधील खाते प्रमुख व जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त जिल्‍‍ह्यात राबविण्‍यात येणा-या स्‍वच्‍छता उपक्रमाचा त्‍यांनी आढावा घेतला. त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक संजय तुबाकले, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी रावसाहेब कोलगणे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, नामदेव केंद्रे, रेखा कदम, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी ठाकूर-घुगे यांनी स्‍वच्‍छता ही सेवा, एकदाच वापरात येणा-या प्‍लॉस्‍टीक बंदी, सांडपाणी व्‍यवस्‍थापनासाठी वैयक्तिक व सार्वजनिक शोषखड्डे तयार करणे, घनकचरा व्‍यवस्‍थापन आदी विषयी मार्गदर्शन करुन आढावा घेतला. सध्‍या केंद्र शासनाच्‍या वतीने स्‍वच्‍छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ सर्वेक्षण सुरु असून या सर्वेक्षणात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी लक्ष देऊन नागरीकांच्‍या प्रतिक्रिया नोंदवून घ्‍याव्‍यात.

तसेच गावस्तरावर स्‍वच्‍छता विषयक सर्व बाबी पूर्ण कराव्‍यात. या सर्वेक्षणाचे गुणांकन करण्‍यात येणार आहे. सर्विस लेव्हल प्रोग्रेससाठी ३५० गुण, थेट निरीक्षण तीनशे गुण, नागरिकांचा प्रतिसाद ३५० गुण याप्रमाणे गुणांकन होणार आहे. त्‍यासाठी गट विकास अधिकारी यांनी नियोजन करुन स्‍वच्‍छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ मध्‍ये उत्कृष्ट कामगिरी करावी, असे आवाहन त्‍यांनी केले आहे.

loading image
go to top