नांदेड : उपमहापौरपदासाठी अब्दुल गफार

नांदेड वाघाळा महापालिका; सभापतिपदी किशोर स्वामी
उपमहापौरपदासाठी अब्दुल गफार
उपमहापौरपदासाठी अब्दुल गफारsakal

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेत उपमहापौरपदासाठी कॉँग्रेसचे अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांनी तर स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी कॉँग्रेसचेच किशोर स्वामी यांनी बुधवारी (ता. एक) नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांच्याकडे अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे. गुरूवारी (ता. दोन) या दोन्‍ही पदासाठी निवडणुक होत आहे.

महापालिकेत उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी गुरूवारी (ता. दोन) निवडणुक होणार आहे. त्यासाठी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने उपमहापौर पदासाठी कॉँग्रेसतर्फे अब्दुल गफार, उमेश चव्हाण, प्रशांत तिडके पाटील आणि हुसेन शोएब मजहर यांनी तर सभापतीपदासाठी कॉँग्रेसतर्फे विद्यमान सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, माजी सभापती किशोर स्वामी, राजू काळे पाटील, अब्दुल हफीज यांनी मंगळवारी (ता. ३०) अर्ज घेतले होते. बुधवारी (ता. एक) अर्ज भरताना उपमहापौरपदासाठी अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांनी तर सभापती पदासाठी किशोर स्वामी यांनी अर्ज दाखल केला. याबाबतचा निर्णय पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला.

उपमहापौरपदासाठी अब्दुल गफार
जळगाव : हिरापूरजवळ भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

आता या पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे त्यांची निवड निश्चित आहे पण औपचारिकता बाकी राहिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे, सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी महापौर शैलजा स्वामी, माजी उपमहापौर उमेश पवळे, श्याम दरक, निलेश पावडे, अब्दुल गफार यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

गुरूवारी (ता. दोन) सकाळी अकरा वाजता उपमहापौर पदाची तर दुपारी दोन वाजता सभापतीपदाची निवडणुक होणार आहे. पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित राहणार असल्याची माहिती नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com